आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:12 मंत्र्यांसोबत कॅबिनेट बैठकीत सहभाग, त्याच्या तीन दिवसांतच धनंजय मुंडेंना संसर्ग

बीड9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक टेस्ट निगेटिव्ह, दुसरी पॉझिटिव्ह : कोरोनाची लक्षणे नाहीत, प्रकृती ठणठणीत

उद्धव ठाकरे सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद भूषवणाऱ्या धनंजय मुंडेंसह त्यांच्या ५ सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. मुंडेंच्या स्वयंपाक्याची चाचणी पाॅझिटिव्ह आली होती. त्यानंतर बंगल्यावरील इतरांची चाचणी करण्यात आली. त्यात दोन सहायक, दोन चालक हेसुद्धा कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘मुंडेंच्या २ चाचण्या घेतल्या होत्या. एक निगेटिव्ह तर दुसरी पॉझिटिव्ह आली. मात्र त्यांच्यात अद्याप करोनाची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना श्वसनाचा थोडासा त्रास होत आहे. तरीसुद्धा खबरदारी म्हणून मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले जाईल. त्यासंदर्भातली सगळी तयारी झाली आहे,’ अशी माहितीही राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली.

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर कोरोनाचा संसर्ग झालेले मुंडे हे तिसरे मंत्री आहेत. बहीण पंकजांनी धनंजय यांना शुक्रवारी सकाळी फोन करून कोरोनातून लवकर बरा हो, अशा सदिच्छा दिल्या.

हे मंत्री हादरले

मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब पाटील, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, अनिल परब व नितीन राऊत हे मंत्री हजर हाेते. लक्षणे आढळली तर त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

बीडचे जिल्हाधिकारी सेल्फ हाेम क्वाॅरंटाइन 

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मुंडे व त्यांच्या स्वीय सहायकांच्या संपर्कात आलेल्यांनी २८ दिवस हाेम क्वाॅरंटाइन हाेण्याचे आवाहन केले. त्यानंतर ते स्वत: हाेम क्वाॅरंटाइन झाले आहेत.

या दोन कार्यक्रमांत धनंजय मुंडे सहभागी

९ जूनला मंत्रिमंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी होते. १० जूनला सीएसटी येथील राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमातही त्यांनी हजेरी लावली. याबाबत टोपे म्हणाले, ‘मुंडे दोन्ही ठिकाणी उपस्थित होते. मात्र, वर्धापन दिनाचा कार्यक्रम अवघ्या ५ मिनिटांचा होता. तिथे कुणाचेही भाषण झाले नाही. तसेच मंत्रिमंडळाची बैठक आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून झाल्याचेही टोपे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...