आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंतीनिमित्त आयोजन‎:उद्यापासून राज्य पारंपरिक‎ ड्रेस डिझायनिंगची स्पर्धा‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले व माँसाहेब‎ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त‎ मंगळवारी दि. ३ ते १२ जानेवारी‎ २०२३ या कालावधीत राज्यस्तरीय‎ पारंपारिक ड्रेस डिझायनिंग स्पर्धा‎ आयोजित करण्यात आली आहे. .‎ त्याचबरोबर महात्मा जोतिबा फुले,‎ सावित्रीबाई फुले यांच्या अखंड‎ काव्यावर आधारित विशेष संगीत‎ मैफल स्वर फुलोरा कार्यक्रम,‎ माँसाहेब जिजाऊ यांच्या‎ जयंतीनिमित्त व्याख्यान होणार आहे‎ अशी माहिती प्राचार्य अश्विनी बेद्रे‎ यांनी दिली.‎

दि.३ रोजी सकाळी ७:३० वाजता‎ अभिवादन रॅली, दि.४ रोजी सकाळी‎ १०:३० वाजता ड्रेस डिझाइनिंग‎ स्पर्धेचे उद्‌घाटन, यानंतर पारंपारिक‎ ड्रेस डिझायनिंग स्पर्धा, दि.५ रोजी‎ सकाळी १०:३० वाजता इन्स्टॉलेशन‎ स्पर्धा, दि.६,७,८ जानेवारी रोजी‎ सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत‎ फॅशन एक्झिबिशन, दि.९ रोजी‎ सकाळी ११ वाजता स्वर फुलोरा‎ कार्यक्रम होणार आहे. दि.१२‎ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता‎ माँसाहेब जिजाऊ जयंतीनिमित्त‎ व्याख्यान होणार आहे. आले असून‎ या दिवशी कार्यक्रमाची सांगता,‎ बक्षीस वितरणाचा होणार‎ असल्याची माहितीही प्राचार्य बेद्रे‎ यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...