आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतर शहराच्या तुलनेत गेवराईचे काम उत्कृष्ट‎:जिल्हाधिकारी मुधोळ यांचे प्रतिपादन,  हरित नर्सरीचे उद्घाटन‎

गेवराई‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई नगरपालिकेचे काम इतर‎ शहराच्या तुलनेत चांगले असून‎ शहरांमध्ये आल्यानंतर येथील‎ स्वच्छता आणि रस्ते पाहून मन प्रसन्न ‎ ‎ झाले. शहरातील विकास कामे पाहता ‎ ‎ शहर प्रगती कडे वाटचाल करत असून‎ येथे सर्व सुख सुविधा नागरिकांना‎ मिळत असल्याने मनाला समाधान ‎ ‎ वाटले, असे गौरवोद्गार‎ जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी‎ व्यक्त काढले.‎ गेवराई नगर परिषदेच्या महिला बचत‎ गटाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान,‎ माझी वसुंधरा अभियान व हर घर‎ नर्सरी उपक्रमांतर्गत हरीत नर्सरीचे‎ उद्घाटन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ‎ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी‎ त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी नगरसेविका गीता पवार‎ होत्या.

तर प्रमुख पाहुणे म्हणून‎ तहसीलदार सचिन खाडे, न. प.‎ मुख्याधिकारी विशाल भोसले हे‎ उपस्थित होते. पुढे बोलताना त्या‎ म्हणाल्या की, गेवराई शहरात बचत‎ गटांच्या माध्यमातून चांगले काम आहे.‎ पात्र निराधार महिलांना अनुदान‎ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.‎ तसेच पात्रच महिलांनी अनुदान‎ मिळविण्यासाठी अर्ज करावेत.‎ आलेले अर्ज महसूल विभागाकडून १५‎ मार्च पर्यंत मंजूर केले जातील असे‎ आश्वासन उपस्थित महिलांना दिले.‎

शहरात आल्यानंतर शहरातील साफ‎ सफाई, स्वच्छता दिसली. कुठेही दुर्गंधी‎ युक्त वातावरण दिसले नाही. इतर‎ शहरात खूप अस्वच्छता असते,‎ रस्त्यावर नालीचे पाणी आलेले असते.‎ आशा वेळी गेवराई शहरात चांगले‎ काम होत असल्याचे दिसले. हे सर्व‎ काम पाहून खूप समाधान वाटले. इतर‎ शहराच्या तुलनेत गेवराई शहर खूप‎ स्वच्छ आणि सुंदर वाटले. गेवराई शहर‎ स्वच्छ व सुंदर दिसले. शहरांमधील‎ ओपन स्पेस सुरक्षित असल्याचे मला‎ सांगण्यात आले. हे ओपन स्पेस‎ बिल्डरांच्या घशात जाऊ देऊ नका,‎ असे आवाहन त्यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...