आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्षासाठी लढा:बीड शहरात मेस्टाच्या राज्यव्यापी एकदिवशीय अधिवेशन; इंग्रजी शाळांसह शिक्षकांचे कोरोना काळात अतोनात हाल

रवी उबाळे | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता महाराष्ट्रातील सर्व विधान परिषदेच्या जागा लढवणार

महाराष्ट्रात मागील काळात कुठल्याही विधान परीषदेच्या आमदाराने इंग्रजी शाळांच्या संस्थाचालक व शिक्षकांबद्दल एकही मुद्दा उपस्थित केला नाही. किंवा विधान परीषदेत समस्या मांडल्या नाहीत. मागील कोरोना काळात आमच्या शाळांचे व शिक्षकांचे अतोनात हाल झाले याबद्दल चिकार शब्द आमदारांनी काढला नाही. परिणामी शाळांच्या समस्या वाढतच गेल्या. विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा यांचे नुकसान झाले. मेस्टा या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात होऊ घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघातील सर्व जागा लढवण्यात येणार असल्याचा ठराव एकमुखाने अधिवेशानामध्ये मंजूर केला आहे.

बीड शहरातील आशिर्वाद लॉन्स येथे रविवारी (दि. 28) महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना (मेस्टा) ची राज्य कार्यकारिणीचे एक दिवसीय अधिवेशन झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. नामदेव दळवी, महासचिव डॉ. विनोद कुलकर्णी, महाराष्ट्र कार्यक्रारी अध्यक्ष प्रा. विजय पवार, प्रदेश संघटक प्रा. अनिल असलकर, प्रदेश कोषाध्यक्ष प्रा. मनिष हांडे, महा. प्रदेश शिक्षक विंग प्रा. संतोष तांबे, महा प्रदेश सचिव डॉ सतिष गोरे, कला क्रीडा व स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा विश्वजित चव्हाण उपस्थित होते.

शिक्षक पगाराविना निवृत्त

संस्थापक अध्यक्ष तायडे पाटील म्हणाले, संघटनेने शाळा सुरू करण्यास शासनाला निर्वाणीचा इशारा दिला होता. तेव्हा कुठे शाळा सुरू झाल्या नाही तर सरकार झोपेतच होते प्रशासन बिंदास्त होते. आता आपण हळू-हळू सावरत आहोत. सरकार विनाअनुदानित शाळांचे प्रश्न सोडवू शकले नाही परिणामी शाळांच्या शिक्षकांचे प्रश्न वाढतच गेले. त्यात अनेक शिक्षकांनी आत्महत्या पण केल्या काही शिक्षक तर पगारा विना निवृत्तही झाले. परिपूर्ण शिक्षण घेऊनही अनेक वर आणि त्यांचे प्रश्न अजूनही सुटू शकले नाहीत. डॉक्टर, वकील, इंजनिअर, यांचे देशोधडीला लागले आहेत, म्हणुन आता संघटनेने ठरविले आहे.

संस्थापक मोठ्या संख्येने सहभागी

महाराष्ट्रात इतक्या शाळा विद्यार्थी आणि पालक यांना सोबत घेऊन शैक्षणिक क्रांती आपणच घडवू शकतो? शेवटी सगळ्या प्रश्नांची सोडवणूक राजसत्तेत सहभागी झाल्याशिवाय होत नाही. म्हणून भविष्यात आपल्यालाच आपले प्रश्न घेऊन लढणारा आमदार आपण का निर्माण करू नये? ही भूमिका घेऊन सर्व विधान परिषद क्षेत्रात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीची निवडणूक लढवून आपले प्रश्न आपण स्वतः सोडवणे आणि शिक्षण क्षेत्राला न्याय मिळवून देणे हे एकमेव उद्दिष्ट असणार आहे. असा ठराव आजच्या राज्यकार्यकरिणीच्या बैठकीमध्ये सर्वांनुमते घेण्यात येत आहे. बीड शहरामधील अखिलेश ढाकणे, गणेश मैड, हेमंत बडवे, ज्ञानेश्वर तांबे, डॉ. पिंगळे यांच्यासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागूपर, अमरावती, कोकण, मराठवाडा यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून 300 पेक्षा अधिक इंग्लिश स्कुल संस्थापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे ठराव पारीत

शाळांना स्वतंत्र संरक्षण कायदा करा, मालमत्ता कर रद्द करावा, व्यवसायीक दराने भरवे लागणारे लाइटबील रद्द करावे, रिक्त असलेल्या आरटीईच्या जागा भरण्याची परवानगी द्यावी, आरटीईच्या विद्यार्थीचा थकीत फीपरतावा दिल्याशिवाय पुढील प्रवेश देणार नाहीत, इरादा पत्राची अट रद्द करून दर्जावाढ स्थानिक पातळीवरच द्यावी, शासन स्तरावर प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढावे, आरटीई प्रवेशीत विद्यार्थी शिष्यवृत्ती स्पर्धापरीक्षेत सहभागी करून घ्यावे. शाळा सोडण्याचा दाखला अनिवार्य करावा.

राज्य, विभागीय व जिल्हा पातळींवर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम राबवणार, राज्य पातळींवर इंग्रजी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा घेणार, इंग्रजी शाळांच्या शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून वैद्यकीय मदत मिळवून देणार, शासनाकडून इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवृत्ती वेतन मिळवून देणार, चालू शैक्षणिक वर्षात मेस्टाचे महाअधिवेशन दिनांक 4,5,6 जानेवारी 2023 नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे घेण्यात येणार, 18 सप्टेंबर 2022 रोजी मराठवाडा विभागीय शिक्षण परीषद लोहा जिल्हा नांदेड येथे घेण्यात येणार.

बातम्या आणखी आहेत...