आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याच्या संरक्षक भिंत व सुशोभीकरणाचे काम औरंगाबादप्रमाणे दर्जेदार करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश ते शिवतिर्थ बीड अशी टाळमृदंगाच्या गजरात पायीदिंडी काढण्यात येणार आहे. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्याभोवतीच्या संरक्षक भिंतींचे काम निकृष्ट होत असल्यामुळे शिवप्रेमींनी काही दिवसापूर्वी ते बंद पाडले होते.
सदरील काम औरंगाबाद प्रमाणे दर्जेदार करण्याची गरज आहे. या बाबत शिवप्रेमींनी बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याकडे मागणी केली होती. दरम्यान मुख्याधिकारी अंधारे यांनी बाबत बैठक घेऊन लवकरात लवकर काम करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान शिवजन्मोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवुन ठेपला असून अजुनही प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे संरक्षक भिंत व सुशोभकरण तातडीने करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश ते शिवतिर्थ बीड अशी टाळमृदंगाच्या गजरात पायी दिंडी काढण्यात येणार आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.