आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:केजमध्ये चार ठिकाणी मोबाइल टॉवरवरील केबल नेले चोरून;  केज आणि युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

केज21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील चार ठिकाणी एकूण ९० हजार रुपयांचे केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी केज व युसूफवडगाव पोलिसांत चाेरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

नाव्होली येथील मोबाइल टॉवरवरील एअरटेल कंपनीचे २३५ मीटर कॉपर केबल व ४० फूट जिओ कंपनीचे केबल असा २० हजार ७५ रुपये किमतीचे वायर चोरांनी लांबवल्याची घटना ८ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. कंपनीचे अधिकारी शिवलाल मसाजी जगताप (रा. भवानवाडी, ता. जि. बीड) यांनी केज पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. तपास जमादार अशोक मेसे करत आहेत.

तसेच याच तालुक्यातील इंड्स कंपनीचे मोबाइल टॉवर आनंदगाव (सा.), चंदनसावरगाव, पैठण (सा.) या गावात आहे. या तिन्ही टॉवरवरील ७० हजार रुपये किमतीचे जिओ कंपनीचे केबल व पावर केबल चोरून नेले. कंपनीचे सुरक्षा अधिकारी गोविंद दत्तात्रय मचाले (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांच्या तक्रारीवरून युसूफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार रामधन डोईफोडे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...