आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हा महिना जागतिक एड्स प्रतिबंधक जनजागृती महिना म्हणून संपुर्ण जगभर साजरा होतो. बीड शहर व परिसरात या उपक्रमांतर्गत जनजागृती करण्यात आली. सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत समुदायाला लागू असणाऱ्या शासकीय योजना जसे की, संजय गांधी निराधार अनुदान योजना,अंत्योदय अन्न सुरक्षा योजना, बालसंगोपन योजना तसेच इतर सामाजिक योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यभरातील ४० संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात एनएमपीसोबत सामाजिक कार्य करत असलेल्या सामाजिक संस्थांनी समुदायाला लागू असलेल्या योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांमध्ये विशेषत: २१ हजार रूपये उत्पन्न प्रमाणपत्राची अट शिथिल करावी. बालसंगोपन योजना समुदायातील बालकांच्या शिक्षणासाठी प्रभावीपणे राबवण्यास मदत करावी आणि सर्वांना अंत्योदय अन्न सुरक्षा योजना किंवा पात्र लाभार्थ्यांना दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका वितरीत करावी अश्या आशयाचे निवेदन प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. बीड येथे हेल्थ केअर कम्युनिटी ऑफ पॉझिटिव्ह पीपल्स आणि विहान प्रकल्प बीडच्या वतीने जिल्हाधिकारी शर्मा यांना निवेदन देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.