आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीवर गुन्हा दाखल‎:गणेशानंद महाराज जोगदंड यांच्या‎ गाडीवर माथेफिरूकडून दगडफेक‎

केज‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साळेगांव (ता. केज) येथील‎ नित्यानंद शांतिब्रह्म आश्रम‎ संस्थानचे मठाधिपती रामायणाचार्य‎ गणेशा नंद महाराज जोगदंड यांच्या‎ उभ्या वाहनावर एका माथेफिरूने‎ दगडफेक करून महाराजांना जीवे‎ मारण्याची धमकी दिल्याची घटना‎ घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध केज‎ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.‎ साळेगांव (ता.केज) येथील‎ नित्यानंद शांतिब्रह्म आश्रम‎ संस्थानचे मठाधिपती रामायणाचार्य‎ गणेशा नंद महाराज जोगदंड यांनी‎ नाथ षष्ठीनिमित्त १० मार्चपासून‎ अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन‎ केले आहे. तर एकनाथ‎ महाराजांच्या मंदिराचे बांधकाम‎ सुरू आहे.

मंदिर बांधकाम सुरू‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ असलेल्या परिसरात गणेशा नंद‎ महाराज हे माजी सरपंच नारायण‎ लांडगे, हनुमंत ठोंबरे, संजय गित्ते‎ यांच्यासोबत सप्ताह कार्यक्रमाबाबत‎ चर्चा करून नियोजन करीत होते.‎ बाजूला त्यांची कार (एम.एच.‎ २५आर. ६८८०) उभी होती. दुपारी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ १२ वाजेच्या सुमारास संतोष धोंडी‎ राम गित्ते या माथेफिरूने गणेशा नंद‎ महाराज जोगदंड व हनुमंत ठोंबरे‎ यांना शिवीगाळ त्यांच्या कार वर‎ दगडफेक करून गाडीचे नुकसान‎ केले. गणेशा नंद महाराज यांनी केज‎ पोलिसांत तक्रार दाखल केली.‎

केज : गणेशानंद महाराज यांच्या‎ वाहनावर दगडफेक करुन प्रकारे‎ नुकसान करण्यात आले .‎ बॅनरवरील फोटोमुळे वाद‎ नाथषष्ठीनिमित सप्ताहाचे‎ आयोजन केले आहे. त्याचे बॅनर‎ लावण्यात आले होते. बॅनरमध्ये‎ लक्ष्मण ओव्हाळ यांचा फोटो असून‎ त्यांचा फोटो का टाकला? म्हणून‎ संतोष गीते यांनी शिवीगाळ करून‎ कारच्या काचा फोडून नुकसान‎ केले.‎ -गणेशानंद महाराज जोगदंड,‎ मठाधिपती‎

बातम्या आणखी आहेत...