आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील वासवडी येथील अप्पाराव पवार यांचा घरकुलाच्या जागेसाठी उपोषण करताना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृत्यू झाला होता. या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांना निलंबीत करा, जागेचा प्रश्न सोडवा या मागणीसाठी माजलगाव तालुक्यात तालखेड फाट्यावर एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र श्रमिक ऊसतोड संघटनेचे राज्य अध्यक्ष जीवन राठोड आणि माजी परिषद सदस्य शरद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात भागवतराव खुळे, गुलाब मोरे, सलीम शेख, कैलास काठवडे, अतुल राठोड, सर्जुन चव्हाण, नयूम कुरेशी, वदन चव्हाण, फाल्गुन चव्हाण, भीमराव जाधव यांनी सहभाग नोंदवला.
यावेळी जीवन राठोड म्हणाले, प्रशासनाने या कुटूंबाला वेठीस धरले ते नेमके कुणाच्या सांगण्यावरून हे समोर यायला हवे, गावातील ग्रामसेवकापासून जिल्हाधिकारीपर्यंत पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी न लागल्याने उपोषणकर्त्याचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार असणाऱ्या सर्वांना निलंबित करून सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी गटविकास अधिकारी व पोलिस प्रशासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवण्यात आले.
उपोषणकर्त्याच्या मृत्यूप्रकरणी विविध पक्ष, सामाजिक संघटनांची निदर्शने पारधी समाजातील आप्पाराव पवार यांचा कलेक्टर कचेरीसमोर उपोषणाला बसल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ तसेच ग्रामसेवकापासून जिल्हाधिकार्यांपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल करा वंचित, आप सह सामाजिक संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले. गेल्या कित्येक वर्षांपासून घराच्या मागणीसाठी बीडच्या प्रशासन दरबारात न्याय मागणार्या पवार कुटुंबातील कर्त्यापुरुषाला अखेर मागणी करत मृत्यूला सामोरे जावे लागले. या प्रकरणातील दोषी असलेल्या ग्रामसेवकापासून जिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी बहुजन वंचीत आघाडी, आप, यासह अन्य सामाजिक कार्य करणार्या संघटनांनी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आणि घोषणाबाजी करत निदर्शने आंदोलन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.