आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:तणाव, कर्जबाजारीपणा : 2 दिवसाला प्रयत्न, दीड दिवसाला एक आत्महत्या

अमोल मुळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षणिक राग, ताणतणाव आणि कर्जबाजारीपणा यामुळे नागरिकांचा स्वत:वरील संयम सुटत आहे. जिल्ह्यात दर दीड दिवसाला एक जण जीवन संपवत आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या ३०४ दिवसांत जिल्ह्यात ४६१ जणांनी आत्महत्या केल्याची नोंद पाेलिस दप्तरी झाली आहे. आत्महत्यांचा हा आकडा चिंताजनक आहे.

मागील काही दिवसांमध्ये आत्महत्यांच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी बीड तालुक्यात २, शिरूर तालुक्यात १ आणि केज तालुक्यात १ अशा एकूण ४ आत्महत्यांची नोंद झाली. मागील महिनाभरात आत्महत्येसाठी निघालेल्या ३ जणांचे पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले. आत्महत्यांची बहुतांश कारणे ही किरकोळ स्वरूपाची असून क्षणिक राग व ताणतणावातून आत्महत्या होत असल्याचे दिसते. पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांच्या काळात जिल्ह्यात एकूण ४६१ आत्महत्यांची नोंद पोलिस दप्तरी झाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या व मानसोपचार विभागाकडून समुपदेशन केलेल्या १० महिन्यांतील व्यक्तींची संख्या १४१ इतकी आहे. खासगी रुग्णालयात उपचार करणाऱ्यांची नोंद होत नसल्याने आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, मिळालेल्या आकडेवारीनुसारही सरासरी काढल्यास सुमारे २ दिवसाला जिल्ह्यात एक जण आत्महत्येचा प्रयत्न करतोय, तर दीड दिवसाला एक आत्महत्या नोंद होत असल्याचे दिसत आहे.

आत्महत्येची मानसिक कारणे कोणती? : आत्महत्येचे प्रमुख कारण हे रागावर नियंत्रण नसणे आहे. कुुटुंबातील संवाद कमी झाला आहे. काेरोनानंतर अनेकांची आर्थिक घडी विस्कटली. चुकीच्या जीवनशैलीने चिडचिडेपणा वाढतो.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात : जीवनशैली, नियमित आहार चांगला ठेवा जिल्ह्यात एकूण आकडे असे ४६१ जिल्ह्यात एकूण आत्महत्या ३७० पुरुषांच्या आत्महत्या ६५ जिल्ह्यात महिलांच्या आत्महत्या ११ मुलांच्या आत्महत्या १५ मुलींच्या आत्महत्या

नैराश्यातून आत्महत्या? तंबाखू, दारू, सिगारेट, गुटखा, चहा हे मेंदूला उत्तेजना देणारे घटक आहेत. त्यांचेही प्रमाण कमी असावे. व्यसनाधीनतेतून कर्जबाजारीपणाही वाढतो.

नैराश्याची कारणे? अतिमहत्त्वाकांक्षा, अवास्तव अपेक्षा यातून नैराश्य येते. आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडू शकत नाहीत ते स्वीकारण्याची तयारी हवी.

सोशल मीडिया, मोबाइलमुळे चिडचिडेपणा मोबाइल हा कौटुंुबिक संवादात अडथळा ठरत आहे. कोविडनंतर मोबाइलचा वापर वाढल्याचे निरीक्षण आहे. अधिक वेळ मोबाइलवर काढल्यास मेंदू थकून चिडचिडेपणा वाढतो.

महिनानिहाय आकडेवारी महिना आत्महत्या प्रयत्न जानेवारी ४० १५ फेब्रुवारी ५९ २४ मार्च २८ ०२ एप्रिल ४९ १९ मे ६५ १७ जून ५९ १५ जुलै २८ ०६ ऑगस्ट ४५ १३ सप्टेंबर ३३ ११ ऑक्टोबर ५५ ०३

बातम्या आणखी आहेत...