आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता कामाची पाहणी:विकासकामांना निधी आणण्यासाठी‎ प्रयत्नशील : आमदार क्षीरसागर‎

बीड‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राष्ट्रवादी भवन ते‎ सोमेश्वर मंदिरपर्यंतच्या ८००‎ मीटरच्या रस्त्याचे काम दोन‎ दिवसांपूर्वी आ. संदीप क्षीरसागर‎ यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात‎ आले होते. त्यानंतर बुधवारी या‎ रस्त्यावरील पडलेले खड्डे आधी‎ बुजवून त्यावर हॉटमिक्स लेअर‎ टाकण्यास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात‎ आली. आमदार संदीप क्षीरसागर‎ यांनी या कामाची पाहणी केली.‎ शहरातील बार्शी रोडवरच्या ८००‎ मीटर रुंदीच्या कामाची बुधवारी‎ प्रत्यक्षात सुरुवात झाली.

राष्ट्रवादी‎ भवन ते सोमेश्वर मंदिर या भागात‎ मोठ्या प्रमाणावर रस्त्या खड्डे‎ पडलेले होते. दोन दिवसांपूर्वी हे सर्व‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ खड्डे अगोदर बुजवण्यात आले.‎ त्यानंतर बुधवारी प्रत्यक्षात‎ हॉटमिक्स लेअर टाकण्यात येत‎ असून हे काम येत्या दोन दिवसांत‎ पूर्ण होणार असल्याचे आ. संदीप‎ क्षीरसागर यांनी सांगितले. हे काम‎ लवकरात लवकर आणि दर्जेदार‎ पध्दतीने करून घेण्यासाठी आ.‎ क्षीरसागर थेट रस्ता कामाच्या‎ ठिकाणी बुधवारी सकाळी भेट‎ देण्यासाठी गेले. प्रत्यक्ष उभा राहून‎ त्यांनी हे काम सुरू ठेवले.

पुढील‎ काही दिवसांत रखडलेले रस्त्याचे‎ अन्य कामे पूर्ण होणार असल्याचेही‎ त्यांनी सांगितले. शासनदरबारी‎ अनेक रस्त्यांच्या कामाला सरकारने‎ स्थगिती दिली आहे. मात्र रस्त्याच्या‎ व विविध विकासकामांना लवकरच‎ निधी मिळवून मंजुरी मिळावी‎ यासाठी आपले प्रयत्न निरंतर सुरू‎ असून बीड शहरासह ग्रामीण‎ भागाचा जास्तीत विकास करणेच‎ आपले ध्येय असल्याचे आ. संदीप‎ क्षीरसागर यांनी म्हटले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...