आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:विद्यार्थी हीच कुठल्याही शिक्षकासाठी‎ खऱ्या अर्थाने अमूल्य अशी संपत्ती‎; शिवाजी जाधव यांचे प्रतिपादन

माजलगाव‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थी हीच कुठल्याही शिक्षकाची‎ संपत्ती असते. विद्यार्थी मोठा झाला याचा ‎ ‎ सगळ्यात जास्त आनंद शिक्षकाला होत ‎ ‎ असतो. त्यामुळे आज वेगवेगळ्या‎ क्षेत्रात कार्यरत असलेले यशस्वी‎ विद्यार्थी पाहून समाधान होत आहे.‎ तसेच विद्यार्थ्यांकडून मिळालेला सन्मान‎ हा आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा ‎ ‎ आणि महत्त्वाचा सन्मान असल्याचे ‎प्रतिपादन शिक्षक शिवाजी जाधव यांनी‎ केले.‎ माजलगाव तालुक्यातील लऊळ‎ येथील गजानन विद्यालयातील सन‎ १९९७ च्या दहावी बॅचमधील‎ विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा संपन्न‎ झाला. या मेळाव्यात एकत्रित आलेल्या‎ जुन्या वर्गमित्रांनी गप्पा, आठवणींचा पट‎ उलगडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी‎ मुख्याध्यापक ह.सा. घंटाजी हे होते तर‎ संस्थेच्या अध्यक्षा राजूबाई वैजनाथराव‎ शिंदे या उद्घाटक म्हणून उपस्थित‎ होत्या.

यावेळी संस्थेचे संचालक मोहन‎ डोईफोडे व सर्व माजी, आजी शिक्षक‎ उपस्थित होते. उद्घाटन समारंभात या‎ बॅचच्या मैत्री ग्रुपच्या वतीने उपस्थित सर्व‎ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटे‎ बांधून व सन्मानपत्र देऊन सत्कार‎ करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक‎ अंकुश राठोड यांनी केले. यावेळी‎ प्रा.दयानंद झिंजुर्डे, गणेश लंगडे,‎ रामदास ढगे, मंगल स्वामी, सुनीता‎ भुतडा या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त‎ केले. याप्रसंगी शिवाजी जाधव, ज्ञानोबा‎ पाटील, थोरबोले यांनी मार्गदर्शन केले.‎ अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक‎ ह.सा.घंटाजी यांनी शाळेचे संस्थापक‎ वैजनाथ शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा‎ देऊन गजानन विद्यालय‎ खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या‎ मुला-मुलींना उत्तम शिक्षण देण्यासाठी‎ प्रयत्नशील आहे असे सांगितले.

या‎ शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात यश‎ मिळवत असून २५ वर्षानंतर विद्यार्थ्यांनी‎ शाळेत येऊन दाखवलेला स्नेहभाव,‎ आदर हीच या शाळेची शक्ती‎ असल्याचे प्रतिपादन केले. माजी‎ विद्यार्थी दयानंद झिंजुर्डे यांनी स्वागत‎ गीत गायले तर शिक्षकांना देण्यात‎ आलेल्या सन्मानपत्राचे वाचन रंजना‎ धपाटे यांनी केले.

कार्यक्रमाचे‎ सूत्रसंचालन प्रा. राजाराम झोडगे आणि‎ प्रा सिद्धेश्वर राठोड यांनी केले तर‎ अमोल देशमुख यांनी आभार मानले.‎ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे‎ मुख्याध्यापक घंटाजी, अंकुश राठोड,‎ दिलीप भगत, अनंत शिंदे, अमोल‎ देशमुख, गणेश लंगडे, सुशेन शेंडगे,‎ रंजना धपाटे, मंगल स्वामी, गणेश‎ राठोड, माऊली शिंदे, कैलास भगत,‎ दत्ता गायके यांच्यासह सर्व मित्र‎ परिवाराने परिश्रम घेतले.‎

सहभोजनासह गप्पांचा फड‎
समारंभानंतर सर्वांसाठी भोजनाचा बेत‎ ठेवण्यात आला होता. २५ वर्षानंतर‎ भेटलेले मित्र एकमेकांना भेटण्यात,जुन्या‎ आठवणींना उजाळा देण्यात रमून गेले‎ होते. सायंकाळी साडेपाच वाजता या‎ कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.‎ कार्यक्रम संपल्यानंतरही विद्यार्थ्यांचे पाय‎ शाळेच्या प्रांगणातून बाहेर निघत नव्हते.‎

बातम्या आणखी आहेत...