आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेवराई येथील पोलिस ठाण्यात पोलीस उन्नती दिन सप्ताह या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिस ठाणे हद्दीतील शाळेच्या विद्यार्थी, विद्यार्थिंनी यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली. यावेळी त्यांनी दैनंदिन कामकाज माहिती तसेच शस्त्राविषयी माहिती जाणून घेतली. तसेच शास्त्री चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी पोलीस बँड पथकाचे सादरीकरण करण्यात आले. २ जानेवारी हा महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन असतो. यानिमित्त पोलिस दलाच्या वतीनेे पोलिस उन्नती सप्ताह राज्यभर राबवला जातो.
या माध्यमातून नागरिकांशी सुसंवाद साधून पोलिस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. शालेय विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यांची भेट घडवून आणली जाते आणि त्यांना कामकाजाची माहिती दिली जाते. बालकांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भिती दूर व्हावी, त्यांना पोलिसांविषयी आपुलकी वाटावी, अडचणीच्या काळात पोलिस मदतीला येऊ शकतात हा विश्वास वाटावा यासाठी पोलिसांचा विद्यार्थ्यांशी संवादही या सप्ताहाच्या माध्यमातून घडवला जातो.
याच निमित्ताने गेवराई पोलिस ठाणत मंगळवारी विविध शाळांच्या २५० विद्यार्थ्यांनी भेट दिली. पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे दैनंदिन कामकाज जाणून घेतले. यानंतर शस्त्राविषयी देखील माहिती विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.दैनंदिन कामकाज माहिती तसेच शस्त्राविषयी माहिती जाणून घेतली.
पाेलिस बँड पथकाने वेधले लक्ष
उन्नती सप्ताहाच्या निमित्ताने विविध शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिस बँड पथकाचे सादरीकरण करण्यात येत आहे. मंगळवारी पोलिस बँड पथकाने शास्त्री चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी सादरीकरण केले. विविध देशभक्तीपर गिते वाजवून त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.