आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक स्नेहसंमेलन:बहारदार नृत्य सादरीकरण, कलागुणांनी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी जिंकली मने‎

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या सोळाव्या तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाची सांगता प्री,- प्रायमरी विभागातील निरागस चिमुकल्यांच्या बहारदार आणि रंगतदार सादरीकरणाने झाली.

या संमेलनात बालवाडी ते आठवी च्या विदयार्थ्यांनी‎ आपल्यातील विविध सृजनशील कलागुण सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सचिन गरड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला.

युवानेते डॉ.योगेश क्षीरसागर आणि कल्पतरू फाउंडेशनच्या सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप‎ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर संस्थेचे मार्गदर्शक डॉ. नारायणराव ढाकणे,सचिव डॉ. राजेंद्र ढाकणे, डॉ. विनिता ढाकणे, कार्याध्यक्ष अखिलेश ढाकणे, प्राचार्य मनोज सर्वज्ञ, उप प्राचार्य अमोल कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...