आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने नवनवीन संशोधनावरील महा प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विज्ञान, गणित, भूगोल -पर्यावरण आणि कला व हस्तकला असे चार विभागांतील विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर करण्यात आले. या महाप्रदर्शनाचे उद्घाटन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुर्लेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षक नेते अण्णासाहेब लोणकर, पार्थ प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा योगिता चाळक, सचिव आर. के. चाळक, प्राचार्य गणेश चाळक, उपप्राचार्य वेनु टी आदी मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते. शाळेतील शिक्षक रामदास कदम यांनी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित सविस्तर माहिती दिली.
यानंतर सुनील कुर्लेकर यांनी विज्ञान गणितातील संशोधनाचा अविष्कार यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर या “इग्निशन” शैक्षणिक मेळाव्याचे भव्य उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अण्णासाहेब लोणकर यांनी आर. के. पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकत मुलांना या प्रदर्शनाचा उपयोग भविष्यात संशोधन क्षेत्रात भरारी घेण्यासाठी नक्कीच होईल असे सांगितले. यानंतर आर. के. चाळक यांनी नविन शैक्षणिक धोरणावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत भविष्यात या मुलांना शालेय जीवनात तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती भावी काळात विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील असा आशावाद व्यक्त केला.
या “इग्निशन” शैक्षणिक मेळाव्यात नर्सरी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर केले. या भव्य प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी जवळपास ३८० प्रकल्प सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अग्निशमन यंत्र, पवनचक्की, ज्वालामुखी, पाण्याच्या दाबावर चालणारी लिफ्ट, पाण्यात बुडणारे व पाण्यावर तरंगणारे पदार्थ-प्रयोग,ज्वलनास ऑक्सिजन वायू मदत करतो- प्रयोग,सोलर पंप,विजेरिवर चालणारे कुलर,वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याची टाकी,हृदयाचे कार्य दाखवणारे यंत्र,तरंगणारा फुगा, पाण्यात विरघळणारे व पाण्यात न विरघळणारे पदार्थ-प्रयोग, घर्षण जन्य चुंबकत्व-प्रयोग, हवेलाही वजन असते-प्रयोग , पूर नियंत्रण यंत्र, जलविद्युत निर्मिती, अपघात सूचक यंत्र, ध्वनीपासून वीजनिर्मिती अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या “ इग्निशन” शैक्षणिक मेळाव्याचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थीनी तनिष्का टाक व प्रतीक्षा धुमक यांनी केले. तर ज्ञानेश्वर खरसाडे, गणेश पवार, वैशाली मोटे, रहिम शेख, सुप्रिया जाधव आदी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.
भूगोल, गणिताचे प्रदर्शन या प्रदर्शनासह भूगोल विषयांतर्गत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, केरल, गोवा आदी राज्यांची संस्कृती, वैज्ञानिक तसेच लोकजीवन आदींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. गणितातील नव नविन शोध आणि गणिताला सोपे करण्यासाठीचे विविध प्रकल्प सादर करण्यात आले.
रॅकेटने वेधले सर्वांचे लक्ष भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या प्रगतीचे श्रेयही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रोला )आणि सर्वच संशोधन संस्थेना जाते. या संशोधन केंद्राची विद्यार्थ्यांना शालेय वयात ओळख व्हावी म्हणून विज्ञान विभागाच्या वतीने भव्य रॉकेट तयार करण्यात आले होते. जीएसएलव्ही बनविलेले हे रॅाकेट लक्ष केंद्रित करून घेत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.