आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मंत्र सर्वांना सांगितलेला आहे. त्याचे अनुकरण करून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून यशाची शिखरे सर करावीत. डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी होऊन समाजात स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असे आवाहन केज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीता बनसोड यांनी केले.
केज शहरातील हाउसिंग कॉलनी, महात्मा फुले नगर भागात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्षा बनसोड या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारून इनामदार हे होते तर प्रमुख पाहुणे सुमित शिंदे, श्री आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तात्या गवळी, दत्ता हंडीबाग हे उपस्थित होते.
अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, निबंध, रांगोळी, खो - खो, हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा, समाज प्रबोधनपर भीम गीते व अण्णाभाऊ साठे यांची गीते आणि पोवाडे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. लहान गटातील व मोठ्या गटातील विजेत्यांना आणि विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. पुढे बोलताना नगराध्यक्षा बनसोड म्हणाल्या, ग्रामीण भागात गुणवंत विद्यार्थी आहेत. केवळ मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी विशेष प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे. दोन गोष्टींवरील खर्च कमी करावा मात्र विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काहीही कमी करू नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विकी लोखंडे, अनिल गालफाडे, रोहित कसबे, राजाभाऊ लांडगे, लक्ष्मण थोरात, आशाताई कसबे, प्रवीण लांडगे, विकी लांडगे, राहुल इनकर, अशोक धिवार, विवेक बनसोड, कुणाल पौळ, शरद थोरात, महेश शिंदे, अनिकेत गालफाडे, विजय लांडगे, कपिल लांडगे, विवेक लांडगे, कैलास पौळ, हर्षद जाधव, यश कसबे यांच्यासह नागरिकांची उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक गायकवाड यांनी तर आभार लहू जाधव यांनी मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांना मदत मिळवून देणार
या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते हारून इनामदार म्हणाले की, जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून युवकांना व महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बंसल क्लासमध्ये प्रवेश देऊन त्या विद्यार्थ्यांची ५० टक्के फिस जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गुणवंतांना संधी मिळावी, व्यासपीठ मिळावे, यासाठी प्रभावीपणे प्रयत्न करणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.