आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना महाविद्यालयातील इतर उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेतला पाहिजे. यामुळे आपल्या आत असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळतो. तसेच आपल्या आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करून आपल्या स्वतःमधील कौशल्याचा शोध घेता आला पाहिजे व या कौशल्यावर आधारित करिअर निवडून जीवनात यशस्वी व्हावे असे प्रतिपादन येथील सनदी लेखापाल आदेश नहार यांनी केले. शहरातील बलभीम कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंत सानप होते तर मंचावर उपप्राचार्य प्रा. विजय गुंड, पर्यवेक्षक प्रा. राम जाधव, प्रा. अश्विनी वावरे, प्रा. प्रशांत धापसे यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.वसंत सानप अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या विषयातील सखोल ज्ञान मिळवून आपले स्वतःचे विचार बनवावे व स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करावी असे आवाहन यावेळी केले.
प्रा. विजय गुंड म्हणाले की, महाविद्यालयीन जीवनात प्राप्त केलेले ज्ञान, अनुभव हे आयुष्याची शिदोरी असतात. या ज्ञान व अनुभवांच्या आधारे महाविद्यालयीनच नव्हे तर जीवनाची परीक्षा देखील यशस्वीपणे पार पाडता येते. प्रा. प्रशांत धापसे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, गुणपत्रिकेत गुणांची सुज म्हणजे गुणवत्ता नव्हे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे गुणवत्ता होय असे ते म्हणाले. याप्रसंगी अंजली वडमारे, अभिषेक मुळे, मानसी क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सिद्धी देशमुख हिने केले. परिचय अभिषेक मुळे याने करून दिला. सूत्रसंचालन मानसी क्षीरसागर, अंजली वडमारे यांनी केले आभार ज्ञानेश्वर यादव याने मानले.
संभाषण कौशल्य कोणत्याही व्यवसायाचा आहे पाया आदेश नहार यांनी यावेळी बारावीनंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना करिअरच्या ज्या विविध संधी आहेत त्याबद्दल मार्गदर्शन केले. श्रीमती अश्विनी वावरे म्हणाल्या की, यशस्वी होण्यासाठी कुठलाही मधला मार्ग नसतो त्यासाठी परिश्रम व चिकाटी आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी काळाची व समाजाची गरज ओळखून करिअरची निवड केली पाहिजे. संभाषण कौशल्य हे कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो हे लक्षात ठेवले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.