आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुन्या काळात माहितीचे स्रोत मर्यादित असल्याने विविध प्रकारच्या करिअरबद्द्ल फार माहिती मिळत नव्हती. परंतु आजच्या पिढीला विविध माध्यमातून विविध प्रकारच्या करिअर संधीबद्दल माहिती मिळवून योग्य करिअरची निवड करता येऊ शकते. त्यामुळे सर्वांनी फक्त डॉक्टर, इंजिनिअर एवढेच ध्येय न ठेवता इतर क्षेत्रांबद्दलही माहिती घेऊन अभ्यासपूरक करिअरची निवड करावी, असे प्रतिपादन सीए बी.बी.जाधव यांनी केले.
बीड येथे जोशीज मॅथस क्लासेस येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी शेतीनिष्ठ शेतकरी जीवनराव बजगुडे, पत्रकार लक्ष्मीकांत रुईकर, रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष गणेश मुळे व सचिव विकास उमापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जीवनराव बजगुडे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासावर भर देत यश मिळवण्यासाठी प्रयत्न राहण्याचे आवाहन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अथर्वन पोहनेरकर, खुशी राठोड, राम धांडे, प्रदीप राजगुडे, प्रद्युम्न पांडव, विश्वजित गुंदेकर, ऋतुजा मोकाशे, प्रसाद चौरे, शिवम यादव, अफीफा इनामदार, कृत्तिका कुलकर्णी, आयुष अग्रवाल, सम्राज्ञी ठाकरे, प्रमोद चव्हाण, प्रसाद आखाडे, प्रतीक्षा नागरे, आश्लेषा सौन्दलकर, आशुतोष धांडे, मानसी जगताप, साईराज देशमुख, तेजस देवकर, सिद्धी फावडे, अजित खेडकर, यश शेलार, मानसी सिसोदिया, श्रेयस संचेती, उन्नती पुरी, ऋतुजा इंगोले, अभिषेक उपरे, अश्विनी खेडकर आदी विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. सूत्रसंचालन प्रा.सुनील जोशी यांनी केले. बीड येथे इयत्ता बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शहरातील मान्यवर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.