आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त:सुभेदार अशोक आरसूळ भारतीय सैन्यदलातून झाले सेवानिवृत्त

गेवराई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील बेनसूर येथील रहिवासी तथा सुभेदार अशोक माणिकराव आरसूळ हे ३१ जुलै रोजी भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले. सुभेदार आरसूळ हे सन १९९४ मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. २८ वर्षे देशातील जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाबसह विविध राज्यांत त्यांनी देशसेवा केली.

प्रदीर्घ सेवेदरम्यान त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आले. ३१ जुलै २०२२ रोजी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले असून सेवापूर्तीनिमित्त त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करून गौरव होत आहे. दरम्यान, सुभेदार आरसूळ यांनी देशासाठी दिलेली सेवा ही ग्रामस्थांसाठी मोलाची असून युवकांनी त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिष्ठितांनी मत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...