आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:योग्य दिशेने परिश्रम केल्यास हमखास यश मिळते; प्रतिपादन प्राचार्य आबासाहेब हांगे

पाटोदा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणताही अभ्यास करत असताना योग्य दिशा ठरवून व वेळेचे नियोजन करून परिश्रम केल्यास हमखास यश मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य आबासाहेब हांगे यांनी केले. पाटोदा येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करताना ते बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. गणेश पाचकोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, प्रोफेसर महादेव काळे यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रथम संस्थेच्या संस्थापिका कै. सौ. केशरबाई क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. प्रास्ताविकात पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड यांनी सत्कार कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. याप्रसंगी बारावी परीक्षेत विविध ज्ञानशाखांमधून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य हांगे पुढे म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार म्हणजे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप होय. विद्यार्थी दशेत आपले ध्येय साध्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, परंतु प्रतिकूल परिस्थितीतही जे आपले निश्चित ध्येय ठरवून मेहनत करतात त्यांना यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. यावेळी कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...