आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड येथील आझाद हिंद सेमी इंग्लिश उर्दू शाळेने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या बीड टॅलेंट सर्च अकॅडमीच्या वतीने आयोजित परीक्षेत यश प्राप्त केले. शाळेच्या ११ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत उत्तम गुण मिळवले.
बीड शहरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीसाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने बीड टॅलेंट सर्च ही परीक्षा पार पडली. या परीक्षेत बीड शहरातील ३४ शाळेतील १२०० मुलांनी सहभाग घेतला होता. बीड येथील आझाद हिंद सेमी इंग्लिश उर्दू शाळेच्या ११ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांत शेख आयेशा, शेख अनस, सय्यद हूरैन, हाश्मी बुशरा, तांबोळी रेहान, शेख म.कैफ, शेख सुलेमान, सय्यद लायबा, शेख सदफ, सय्यद रूखय्या व सय्यद मारीया या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. संस्थेचे सहसचिव फैसल शेख, सय्यद आवेज, शेख रज्जाक, यास्मीन शेख, सय्यदा फिरदोस, मोमीन तरन्नुम, सबा यांनी मुलांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या पुढेही शाळेतर्फे एनटीएस, नवोदय, शिष्यवृत्तीसह इतरही स्पर्धा परीक्षांची तयारी नियमित करून घेणार असून पालकांनीही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे सहयोगी लक्ष दिल्यास यश फार दूर नसल्याचे फैसल शेख यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.