आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिसर्गभूमी संवर्धन संस्था बीडच्या वतीने गांधी जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल सोमवारी (ता.१९ डिसेंबर) लागला. त्यामध्ये श्री शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. निसर्ग भूमी संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अभिमान खरसाडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम वाढीस लागावे या हेतूने गांधी जयंतीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेचा निकाल सोमवारी लागला.
पाचवी ते सातवीच्या गटात तालुकास्तरावर प्रथम येण्याचा मान श्री शिवाजी विद्यालयाचा सत्यजित महेश मोटे याला मिळाला. त्याला ५०१ रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मिळाले तर तालुक्यातून दुसऱ्या येण्याचा मानही शाळेतील राजीव राहुल गोरे या विद्यार्थ्याला मिळाला. त्याला २५१ रुपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले. शालेय स्तरावर नयन नाथाराम घोडके, यश बाळासाहेब चव्हाण, अंकिता शहाजी नाईकवाडे यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले.
या विद्यार्थ्यांना शाळेतील अध्यापिका व्ही.एम.माळी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्था सचिव दिनकरराव कदम, पदाधिकारी ॲड.जगन्नाथराव औटे, शकुंतला लोळगे, पवनराव चौरे, आसाराम सुर्वे, शितल कदम, संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब जगदाळे यांच्यासह मुख्याध्यापक राजेंद्र वाघमारे, उप मुख्याध्यापक राजकुमार कदम ,पर्यवेक्षक बि.डी. मातकर, गिरीष चाळक यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.