आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:संत वामनभाऊंच्या जन्मभूमीमध्ये‎ सप्ताहाची तरुणांकडून जय्यत तयारी‎

शिरुरकासारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिरुरकासार‎ संत वामनभाऊ यांचे जन्मस्थळ‎ असलेल्या शिरुर तालुक्यातील‎ फुलसांगवी येथे संत वामनभाऊ‎ यांच्या ४७ व्या पुण्यतिथीच्या‎ निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे‎ आयोजन करण्यात आले आहे. वे.‎ स्वामी निगमानंद महाराज यांचा‎ मार्गदर्शनाखाली सप्ताहाची परंपरा‎ सुरु झालेली असून स्वामी जनार्दन‎ महाराज यांच्याकडून पुढे चालवली‎ जात आहे. संत वामन भाऊच्या‎ विचारांची पालखी पूर्वजांच्या‎ खांद्यावरून तरुणांच्या खांद्यावर‎ आली आहे. फुलसांगवी गावच्या‎ तरुणांकडून पुण्यतिथी निमित्त अखंड‎ हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी‎ केली जात आहे.‎

प्रत्येक वर्षी नववर्षाच्या पहिल्या‎ महिन्यात फुलसांगवी गावामध्ये संत‎ वामनभाऊ यांची पुण्यतिथी साजरी‎ केली जात असते गेल्या दोन वर्षात‎ कोरोना परिस्थिती मुळे पुण्यतिथी‎ सोहळ्यामध्ये अडचणी निर्माण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ झाल्या होत्या मर्यादित भक्तामध्ये हे‎ उत्सव मागील दोन वर्षांच्या काळात‎ पार पडले होते. परंतु यावर्षी संपूर्ण‎ फुलसांगवी गाव ४७ व्या पुण्यतिथी‎ निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची‎ तयारी करत आहे. यामध्ये तरुणाई‎ विशेष मेहनत घेत आहे.‎

वडिलोपार्जित सुरू केलेली परंपरा‎ आज तरुणांकडून खांद्यावर घेऊन‎ पुढे चालवली जात असल्याने‎ गावाला या कौतुक वाटत आहे.‎ गावातील हेवे दावे बाजूला ठेवून ८‎ जानेवारी रोजी फुलसांगवीत अखंड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हरिनाम सप्ताहाचा आरंभ होणार‎ आहे.‎ सप्ताहामध्ये नामांकित महंतांची‎ कीर्तने, प्रवचने, रक्तदान शिबिरे‎ अशा विविध कार्यक्रमांचे आठ‎ दिवस आयोजन ग्रामस्थांच्या वतीने‎ करण्यात आलेले आहे.‎ चाकरमान्यांची सप्ताहाला उपस्थिती‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ : फुलसांगवी गावामध्ये वर जिल्ह्यात‎ नोकरी करणाऱ्यांची संख्या‎ कमालीची आहे ग्रामस्थांच्या वतीने‎ दरवर्षी पुण्यतिथी सोहळ्याचे‎ आयोजन केले जात असल्याने या‎ सोहळ्याला चाकरमानी नोकरीवर‎ रजा टाकून हजेरी लावीत असतात‎ यांची उपस्थिती लक्षणीय असते.‎फुलसांगवी येथे सप्ताहाच्या मंडप उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.‎

४५ गावांचा सप्ताहात सहभाग‎ संत वामन भाऊ च्या पुण्यतिथी मध्ये दरवर्षी फुलसांगवी गावात अखंड हरिनाम‎ सप्ताह आयोजित केला जात असतो यामध्ये परिसरातील ४५ गावांचा सहभाग असून‎ या गावातील भक्तगण या सप्ताहाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावीत असतात.‎

बातम्या आणखी आहेत...