आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा परतीच्या पावसाने लहान - मोठ्या प्रकल्पासह मांजरा धरण भरल्याने नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस लागवडीकडे शेतकरी वळला आहे. त्यामुळे यंदा खरीप आणि रब्बी हंगामात ७ हजार २७४ हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र गतवर्षी एका साखर कारखान्यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता गतवर्षीहून अधिक उस लागवडीचे क्षेत्र वाढले असले तरी गंगामाऊली नावाचा दुसरा साखर कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस लागवडीस आणखी चालना मिळाली आहे. त्यात अतिरुक्त उसाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे केज तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली होती. अशा परिस्थितीत ही असलेल्या उसावर तालुक्यातील आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने गाळपात खंड पडू न देता कारखाना सुरू ठेवला होता. उसाचे क्षेत्र वाढीस चालना मिळत राहिली. मात्र गत दोन वर्षापासून केज तालुक्यात पाऊसकाळ चांगला होत असल्याने तालुक्यातील लहान - मोठ्या प्रकल्पासह मांजरा धरण ही ओव्हरफलो होत राहिले. त्यामुळे मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिल्याने हा पट्टा पुन्हा ग्रीन बेल्ट म्हणून नावारूपास आला आहे. तालुक्यातील इतर मंडळाच्या तुलनेत मांजरा पट्ट्यात सर्वाधिक उसाचे क्षेत्र आहे. मात्र आता इतर भागातील शेतकरी लघु सिंचन प्रकल्पासह विहिरी, बोअरला असलेल्या उपलब्ध पाण्यावर ऊस पीक घेऊ लागले आहेत.
त्यामुळे गतवर्षी खरीप हंगामात तब्बल ५ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावर ऊस पिकाची लागवड करण्यात आली होती. शिवाय रब्बी हंगामात ही ६७० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाल्याने उसाच्या क्षेत्रात आणखी वाढ झाली होती. त्यामुळे तालुक्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यात येडेश्वरी साखर काखान्याने गाळप क्षमता वाढवून जून महिना अखेरपर्यंत गाळप सुरू ठेवत ८ लाख ४२ हजार ६१६ मे. टन विक्रमी गाळप केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. गतवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात ही ऊस लागवड केली. त्यामुळे खरीप हंगामात ५ हजार १९२ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाल्याने आणखी उसाचे क्षेत्र वाढले.
पुन्हा परतीच्या पावसाने लहान - मोठे प्रकल्प आणि मांजरा धरण भरल्याने रब्बी हंगामात ही ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. त्यामुळे रब्बी हंगामात ही तब्बल २ हजार ८२ हेक्टर ऊस लागवड झाल्याने तालुक्यात यावर्षी ७ हजार २७४ हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. आता दोन वर्षात तालुक्यात १३ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र उसाचे झाले आहे. पाऊसकाळ चांगला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढण्यास चालना मिळाली आहे. तर यावर्षीपासून उमरी फाटा येथील विखे पाटील साखर कारखाना हा बंद पडलेला कारखाना भाडेतत्त्वावर सुरू करण्यात आला असून गंगा माऊली नावाने या ओळखल्या जाणाऱ्या या कारखान्याचे यंदा गाळप सुरू झाले आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा ही मिळाला आहे. महसूल मंडळ निहाय उसाचे क्षेत्र यंदा केज तालुक्यात खरीप हंगामात ५ हजार १९२ हेक्टर तर रब्बी हंगामात २ हजार ८२ हेक्टर उसाची लागवड झाली आहे. तर यंदा लागवड झालेल्या महसूल मंडळ निहाय उसाचे क्षेत्र पुढील प्रमाणे बनसारोळा - २२१२ हे., युसुफवडगाव - १८२३ हे., चिंचोलीमाळी - १२१० हे., होळ - ५८० हे., केज - ५३१ हे., मस्साजोग - ४०८ हे., नांदूरघाट - २४८ हे., हनुमंत पिंपरी - २२२ हे., विडा - ४० हेक्टर.केज तालुक्यात वाढलेले उसाचे क्षेत्र
येडेश्वरीचे १ लाख, गंगामाऊलीचे ४९ हजार मे. टन गाळप
आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्याचे २० दिवसात ८६ हजार २७० मे. टन गाळप झाले आहे. तर उमरी फाटा येथील नव्याने सुरू झालेल्या गंगा माऊली साखर कारखान्याचे एक महिन्याच्या कालावधीत ४९ हजार मे. टन गाळप झाले आहे.
येडेश्वरीचे १ लाख, गंगामाऊलीचे ४९ हजार मे. टन गाळप आनंदगाव ( सा. ) येथील येडेश्वरी साखर कारखान्याचे २० दिवसात ८६ हजार २७० मे. टन गाळप झाले आहे. तर उमरी फाटा येथील नव्याने सुरू झालेल्या गंगा माऊली साखर कारखान्याचे एक महिन्याच्या कालावधीत ४९ हजार मे. टन गाळप झाले आहे. केज तालुक्यात वाढलेले उसाचे क्षेत्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.