आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस प्रश्न:पीक विमा व ऊस प्रश्नावर लवकरच ऊस परिषद

बीड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा आणि ऊस प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्यासाठी चालू महिन्यात बीड किंवा माजलगाव येथे ऊस परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी दिली.

जिल्ह्यातील उसाचा प्रश्न अजूनही जैसे थे आहे. अनेक शेतकरी आजही गतवर्षीच्या पीक विम्यापासून वंचित आहेत. शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून विमाप्रश्नी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही अपेक्षित विमा मिळालेला नाही. गतवर्षी शेतकऱ्यांना ऊस काढणीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागले होते. काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत.यामुळे चालू ऑगस्ट महिन्यात ऊस आणि विमाप्रश्नी ऊस परिषद घेऊन सर्वच विषयांवर चर्चा करून तोडगा काढला जाणार आहे. ऊस परिषदेची तारीख, वेळ आणि ठिकाण लवकरच निश्चित करणार असल्याचेही शेतकरी नेते थावरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...