आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऊसतोड मजुरांचे आंदोलन चिघळले:पाटोद्याजवळ मजुरांचा टेम्पो जाळला; टेम्पोत तब्बल 24 मजूर महिलांसह 8 ते 10 लहान मुले होती

पाटोदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेत टेम्पोतील 6 लाखांची रोकडही खाक

ऊसतोड मजूर, मुकादमांचे भाववाढीसाठी सुरू असलेले आंदोलन हिंसक वळणार आले आहे. मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो शुक्रवारी दुपारी मजुरांना टेम्पोतून उतरवून देत पेटवून दिला गेला. दरम्यान, या टेम्पोत असलेले सहा लाख रुपयेही जळाल्याचा दावा मुकादमाने केला आहे. पाटोदा जवळील अनपटवाडीत ही घटना घडली. पुसद तालुक्यातील मजुरांना घेऊन हा टेम्पो जामखेडकडे जात होता. ऊसतोड कामगारांच्या तोडणी दरात दीडशे टक्के वाढ करावी, मुकादमांच्या व वाहतूकदारांच्या कमिशनमध्ये वाढ करावी यासाठी राज्यात कामगारांचा संप सुरू आहे. अनेक ठिकाणी कारखान्यावर जाणाऱ्या मजुरांना अडवून वाहने परत पाठवली गेली आहेत. चार बैठकांतही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आता आंदोलन हिंसक वळणावर आले आहे. शुक्रवारी जामखेड तालूक्यातील आपटी या गावचे मुकादम गोरे यांनी पुसद, वाशीम भागातील ‘कोयत्या’ला २० लाख रुपयांची उचल दिली होती. या मजुरांना शुक्रवारी त्यांच्या गावातून जामखेड तालुक्यात टेम्पोतून (क्र. एमएच ११ ए एल ३४२६ ) जामखेड तालुक्यात आणले जात होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास पाटोदा परिसरात हा टेम्पो आला असता अनपटवाडी परिसरात चालकाला मारहाण करून तसेच मजुरांना खाली उतरवत टेम्पोला आग लावण्यात आली. या टेम्पाेत तब्बल २४ मजूर महिलांसह आणि ८ ते १० लहान मुलांचा समावेश होता.

राेख ६ लाख रुपयेही जळाले

पेटवून दिलेल्या टेम्पाेत एक कोयता मुकादम करण शेळके यांच्याकडे असलेली सहा लाख रुपयांची रक्कम हाेती. ती टेम्पाेतच राहिल्याने ही रोकडही जळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा टेम्पाे कारखान्यावर चालला नव्हता तर या मजुरांना उचल दिल्याने मजुरीसाठी जामखेड तालुक्यात नेण्यात येत असल्याचे मुकादमाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...