आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:आम आदमी पार्टीचे सुग्रीव मुंडे आज बीडमध्ये ; अशोक येडे यांच्या निवासस्थानी बैठक

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथे आज शनिवार, २० ऑगस्ट २०२२ रोजी पंचायती राज निवडणूकसंदर्भात आम आदमी पार्टीची बैठक होत असुन या बैठकीस मराठवाडा विभागाचे संघटन मंत्री सुग्रीव मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.राज्याचे राज्य अध्यक्ष रंगा राजुरे यांच्या आदेशाने व मराठवाडा विभागाचे संघटन मंत्री सुग्रीव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड मध्ये आज शनिवारी सकाळी अकरा वाजता जुना चऱ्हाटा रोड, अंकुश नगर येथील भगवान इंग्लिश स्कूलच्या बाजूला असलेल्या आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे. या बैठकीस जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे, सचिव रामधन जमले, प्रा. ज्ञानेश्वर राऊत ,संघटन मंत्री, शहराध्यक्ष सय्यद सादेक, रामभाऊ शेरकर, कैलास चंद पालीवाल, बीड तालुका अध्यक्ष भीमराव कुठे आदी उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...