आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेची सॅनिटायझर पिऊन आत्महत्या:पतीने तयार केला कोरोना पॉझिटिव्हचा बनावट अहवाल; दोन जण अटकेत, बोगस अहवाल आणणारा फरार

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजा गणेश रायकर (21, रा. धनगर जवळका, ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने सॅनिटायझर प्राशन करून आत्महत्या केली. मात्र, हा प्रकार उघड होऊ नये यासाठी शवविच्छेदन टाळण्यासाठी पती व सासऱ्यांनी चक्क तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बनावट अहवाल बनवला. परंतु, माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा प्रयत्न फसला. याप्रकरणी चौघांवर पाटोदा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. पूजा गणेश रायकर (२१, रा. धनगर जवळका, ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या तक्रारीनुसार, दाेन वर्षांपूर्वी पूजाचा विवाह गणेश रायकर याच्यासोबत झाला होता. तो पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे.

एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी परतला. लग्नाला दोन वर्षे होऊनही अपत्य होत नाही, असे म्हणत व कारसाठी अडीच लाखांची मागणी करत पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे तिचा छळ करत हाेते. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने बुधवारी (१९ मे) दुपारी तीन वाजता सॅनिटायझर प्राशन केले. पूजाला पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (२६ मे) पहाटे ४ वाजता पूजाचा मृत्यू झाला.

दुसरी कोरोना चाचणी आली निगेटिव्ह
पूजाच्या कोरोना पॉझिटिव्ह चाचणीवर विश्वास नसल्याने माहेरच्या मंडळींनी दुसरीकडे पूजाची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर पूजाचा मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले गेले.

दोन जण अटकेत; बोगस अहवाल आणणारा फरार
पूजाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून तिचा पती गणेश, सासरा शिवाजी, सासू विजुबाई आणि मावस भाऊ नामदेव सुकडे याच्यावर पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि सासऱ्यास ताब्यात घेतले आहे तर सासू आणि कोरोना चाचणीचा बोगस अहवाल आणून देणारा मावस भाऊ फरार आहे.

बातम्या आणखी आहेत...