आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:सौताडा दरीत उडी मारून श्रीगोंदा येथील ग्रामसेवकाची आत्महत्या, आठवडाभरातील दुसरी घटना

पाटोदा/ प्रतिनिधी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय व्यक्तीचे उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. हा व्यक्तीच्या ओळखपत्रावरून तो ग्रामसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. सौताड्यात एकाच आठवड्यात ही दुसरी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पाच ते सहा दिवसांपूर्वी सौताडा येथे रामेश्वर दरीत नगर मधील एका महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी ही दुसरी घटना घडली आहे. काही पर्यटकांनी या व्यक्तीला उडी मारताना पहिल्याने त्यांनी व ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पाटोदा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष पाटील, एपीआय धरणीधर कोळेकर, पोलिस कर्मचारी अशोक तांबे, सोनवणे आदी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी धबधब्याजवळ या व्यक्तीची बॅग सापडली आहे. यामध्ये एक ओळखपत्र सापडले यावरून या मृत व्यक्तीचे नाव झुंबर मुरलीधर गवांदे असून ते पंचायत समिती कार्यालय श्रिगोंदा येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

उंचीवरून खाली उडी मारल्याने मृतदेह सापडण्यास अडचणी आल्या असून या मृतदेहाचा शोध शनिवारी सकाळी घेण्यात येणार आहे. पोलिसांनी मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. चारच दिवसात एकाच ठिकाणी आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने तेथील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...