आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवार:अंबाजोगाई तालुक्यात सूर्यफूल मावळले,‎ सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात झाली वाढ‎

अंबाजोगाईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ तालुक्यात सूर्यफूल पीक मावळले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आडत दुकानावर‎ या पिकाची आवकचं नाही. सूर्यफुलाचा‎ पेरा तालुक्यात शून्यावर आला आहे. सूर्यफुलाची जागा सोयाबीन पिकाने‎ घेतल्यानं सूर्यफुलाची लागवड घटली‎ आहे.‎ पंधरा वर्षांपूर्वी खरीप व रब्बी हंगामात ‎ ‎ सूर्यफूल मोठ्या प्रमाणावर पेरले जायचे. ‎कालांतराने सूर्यफूल पिकावर केसाळ ‎अळीचा प्रादुर्भाव सुरू झाला. हा प्रादुर्भाव ‎मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पीक‎ निघेपर्यंत पाच ते सहा फवारण्या कराव्या‎ लागत असत. रब्बी हंगामात सूर्यफुलास‎ दोन ते तीन वेळा पाणी द्यावे लागत होते‎ .सातत्याने मोठ्या प्रमाणावर पेरा केला‎ जात असल्याने मातीवरही दुष्परिणाम‎ झाला.

परिणामी सूर्यफूल पिकाच्या‎ उत्पन्नात घट झाली. दरम्यान सोयाबीन‎ बियाणे बाजारात उपलब्ध झाले आणि‎ सूर्यफूल पिकाची जागा सोयाबीन पिकाने‎ घेतली. सध्या सूर्यफूल पिकास बाजारात‎ साडेपाच ते सहा हजार रूपये प्रतिक्विंटल‎‎ दर आहे. अंबाजोगाई तालुक्यात डिसेंबर‎ २०२२ अखेरपर्यंत पर्यंतचा रब्बी पिक पेरा‎ पुढील प्रमाणे आहे. तालुक्यात एकूण‎ सात महसूल मंडळ आहेत. त्यात‎ अंबाजोगाई, लोखंडी सावरगाव, ममदापूर‎ पाटोदा, घाटनांदुर, बर्दापूर, उजनी व राडी‎ या महसूल मंडळांचा समावेश होतो. या‎ सात महसूल मंडळात एकूण १०६ गावांचा‎ समावेश आहे.

भौगोलिक क्षेत्र ८७ हजार‎ १५१ हेक्टर असून पेरणीयोग्य क्षेत्र ७७‎ हजार१५२ हेक्टर आहे. यातील ५३ हजार‎ ‎१५४ हेक्टरवर रब्बी पिकाची यंदा पेरणी‎ झाली आहे. तालुक्यात रब्बी ज्वारी एकूण‎ ५ हजार ९७७ हेक्टर, गहु ३ हजार हेक्टर,‎ मका २०८ हेक्टर, हरभरा ४३ हजार ९५२‎ हेक्टर, राजमा ३६६ हेक्टर ,करडई १८६‎ हेक्टर, जवस ६ हेक्टर, सूर्यफूल ० हेक्टर‎ व भुईमूग १०३ हेक्टर पेरा करण्यात आला‎ आहे. सूर्यफूल पिकाचा पेरा गेल्या काही‎ वर्षांपासून शेतकरी करत नाहीत. सूर्यफूल‎ पिकावर केसाळ अळीचा मोठ्या‎ प्रमाणावर प्रादुर्भाव होतो. रब्बी आणि‎ खरीप हंगामामध्ये सूर्यफुलाचा पेरा केला‎ गेल्याने जमिनीचा पोत बिघडला.‎ त्याचप्रमाणे केस केसाळ अळीचे प्रमाण‎ वाढून फवारणीची संख्या वाढली.‎ मजुरांचाही प्रश्न निर्माण झाल्याने‎ शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकाचा पेरा बंद‎ केल्याचे कारण समोर आले आहे.‎ सोयाबीन पिकाचा सुद्धा पेरा शेतकऱ्यांनी‎ रब्बी हंगामामध्ये घेऊ नये असे आवाहन‎ उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत‎ वळखेलकर यांनी केले आहे.‎

सहा हजार रूपये प्रतिक्विंटल‎ सद्या सूर्यफुलास भाव‎ अंबाजोगाई मोंढा आडत बाजारात‎ सूर्यफूल पिकाची खरेदी गेल्या पंधरा‎ वर्षापासून बंदच आहे. सूर्यफूल पीकही‎ शेतकरी विक्रीसाठी आणत नाहीत. सध्या‎ सूर्यफूल पिकास साडेपाच ते सहा हजार‎ रुपयांपर्यंतचा प्रतिक्विंटल दर आहे.‎ दरम्यान तालुक्यात सूर्यफुलाचे उत्पादनही‎ घटले आहे.’‎ - एम.बी .भन्साळी, माजी संचालक,‎ बाजार समिती, अंबाजोगाई‎

बातम्या आणखी आहेत...