आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी:मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच चरबीच्या गाठीवर शस्त्रक्रिया; गेवराईत चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिय केली यशस्वी

गेवराई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक महादेव चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच चरबीच्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेवराई उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून छोट्या, मोठ्या शस्त्रक्रियांची संख्या वाढत असून वैद्यकीय अधीक्षक महादेव चिंचोले हे यासाठी प्रयत्न करत आहेत. सामान्य रुग्णांना शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालये परवडत नाहीत. त्यामुळे, सरकारी रुग्णालयात अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निपाणी जवळका येथील विमल काकडे या महिलेच्या चरबीच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. महादेव चिंचोले, डॉ. राजेश शिंदे, डॉ. मुकेश कुचोरिया, गणेश काकडे, डॉ.रांदड यांच्यासह परिचारिका स्वाती बारगजे, प्रियंका झगडे व इतरांनी यासाठी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...