आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडाझडती:जिल्हाधिकाऱ्यांची शासकीय कार्यालयांना सरप्राइज व्हिजिट; अग्निरोधक यंत्रे बसवण्यासह स्वच्छतेबाबत सूचना

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय कार्यालयातील स्वच्छता आणि अग्निरोधक यंत्रांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शुक्रवारी अचानक विविध शासकीय कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली तसेच कार्यालये सुसज्ज राखतांना स्वच्छ व सुंदर करण्याच्या सूचना दिल्या.

विविध शासकीय कार्यालयांमध्ये जवळपास ९१ अग्निरोधक यंत्र (फायर इस्टींगेशर) बसविण्यात आली असून त्याच बरोबर अभिलेख ठेवण्यात आलेल्या रेकॉर्ड रूम, शासकीय दस्तऐवज असणारे कक्ष यांची पाहणी करून तेथे देखील आवश्यकतेनुसार अग्निरोधक यंत्र बसवण्याचा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपजिल्हाधिकारी धनंजय जगताप, उपविभागीय अधिकारी बीड नामदेव टिळेकर, तहसीलदार बीड मनिषा लटपटे , जिल्हा प्रशासन अधिकारी नीता अंधारे , तहसीलदारी. संतोष बनकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील प्रशासकीय इमारतीमधील अपर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय त्यांच्या अंतर्गत असलेला जिल्हा गौण खनिज कक्ष, अभिलेख कक्ष, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांचा कक्ष, लेखा विभाग, महसूल शाखा, निवासी उपजिल्हाधिकारी यांचा कक्ष आदींची पाहणी केली तसेच भूसंपादन समन्वय उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसीलदार बीड कार्यालय या इमारतीतील जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा भूसंपादन अधिकारी, जायकवाडी प्रकल्प, संजय गांधी योजना, तालुका भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, तालुका पुरवठा कार्यालय आदींची पाहणी केली.

अनेक कार्यालयांमध्ये ठेवण्यात आलेले महत्त्वाची शासकीय कागदपत्रे फाईल व कागदपत्रांचे गठ्ठे सुनियोजित पद्धतीने ठेवण्याबाबत सूचना करण्यात आली या अनुषंगाने आवश्यक रॅक, सरसकती कपाटे यांची व्यवस्था केली जावी, जेणेकरून हा अभिलेख सुरक्षित राहील या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विविध कार्यालयात उपस्थित अधिकारी -कर्मचारी यांच्या कडून माहिती घेतली व सूचना केल्या.

बातम्या आणखी आहेत...