आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आपले मन भगवान शंकराला अर्पण करा, तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही

परळी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले मन भगवान शंकराला अर्पण करा, तुमच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण प्रदीप मिश्रा यांनी केले.परळी शहरात मथुरा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अभिषेक शिवमहापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण प्रदीप मिश्रा हे कथेचे निरूपण करत होते. कथेत त्यांनी बेलपत्राचा महिमा विशद केला. बेलपत्र हे भगवान शंकराला सर्वात प्रिय आहे. आपले मन शंकराला अर्पण करा, जीवनात दुःख येणार नाही. भगवंताला नित्य जलाभिषेक करा. नियमित संत सेवा करा. संतांमुळे सत्संग मिळतो, असेही मिश्रा यांनी सांगितले.

शिवभक्तांनी पाठवलेल्या पत्राचे वाचन केले : कथास्थळी शंकर-पार्वतीच्या सजावटीमुळे उपस्थितांना साक्षात भगवंताच्या दर्शनाची अनुभूती आली. आरतीने तिसऱ्या दिवसाच्या कथेची सांगता झाली. या वेळी मुख्य यजमान गोपाल बन्सीलाल सोमाणी यांच्या परिवारासमवेत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी आरती केली.

प्रभू वैद्यनाथाच्या भूमीत जन्म होणे ही महादेवाची साक्षात कृपा : मागील तीन दिवस मी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाच्या परळीत आहे. इथे जन्माला येणे म्हणजे साक्षात महादेवाची कृपा असे म्हणावे लागेल. शिवाय महादेव ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात असलेल्या गावात आपले सासर असणेही भाग्याचे लक्षण आहे, असा मिश्रा यांनी परळी वैद्यनाथ भूमीचा महिमा विशद केला.

बातम्या आणखी आहेत...