आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:78 बोगस दिव्यांग शिक्षकांचे निलंबन हायकोर्टाने केले रद्दबातल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेत बदलीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र देणारे व फेरतपासणीत तफावत आढळलेल्या ७८ दिव्यांग शिक्षकांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. या कर्मचाऱ्यांना जे. जे. रुग्णालयातील बोर्डासमोर तपासणीसाठी पत्र देण्याचे आदेशही जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्यातील अंतर्गत बदल्यांसाठी प्रवर्ग एकमधून दिव्यांग व गंभीर आजारी असल्याबाबत प्रमाणपत्र सादर केले होते. सुमारे साडेतीनशे शिक्षकांनी असे प्रमाणपत्र दिले होते. प्राथमिक तपासणीनंतर सुमारे अडीचशे शिक्षकांची स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाईच्या बोर्डाकडून फेरतपासणी करण्यात आली होती. दाेन टप्प्यातील अहवालावरून सुमारे ७८ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. यातील काही शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर सुनावणी घेऊन न्यायालयाने शिक्षकांचे निलंबन रद्द करून ज्या शिक्षकांना जे. जे. रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाकडून तपासणी करून घ्यायची आहे, त्यांना जि. प. प्रशासनाने पत्र देण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...