आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:स्वारातीमधील डायलिसिस यंत्र बंद; रुग्णांची गैरसोय

अंबाजोगाई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील एक डायलिसेस यंत्र बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ते यंत्र तात्काळ दुरूस्त करून रुग्णांची गैरसोय दूर करावी अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी शुक्रवारी (दि.३) राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.

स्वाराती रुग्णालयात दोन डायलिसेस यंत्र आहेत. त्यापैकी एक यंत्र बंद राहिल्याने केवळ एकाच यंत्रावर भार पडतो. परिणामी रुग्णांना ताटकळत बसावे लागते. हे यंत्र बंद असल्याने रूग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णांना खासगीत उपचार घेता येत नाहीत. परिणामी वैद्यकीय महाविद्यालयातील एका मशिनवरच काम होत असल्याने रूग्णांना ताटकळत बसावे लागते. या रूग्णालयातील डायलेसीस यंत्रात बिघाड झाल्यास त्याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी संबंधीत एजन्सीची आहे. मात्र संबंधित विभाग त्यांचे देयक वेळेत अदा करत नाहीत. त्यामुळे ही एजन्सी खराब झालेले डायलेसीस यंत्र दुरूस्ती करत नाहीत. रूग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डायलेसीसच्या रूग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. अशी तक्रारही या निवेदनात करण्यात आली आहे. या समस्या लक्षात घेवून बंद डायलेसिस यंत्र तात्काळ दुरूस्त करावे अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...