आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरळेपणा:लातूरच्या 10 बालकांवर स्वारातीमध्ये शस्त्रक्रिया

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरळेपणा या आजारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांची संख्या राज्यात खूप कमी असल्याने लातूर जिल्ह्यातून स्वाराती रुग्णालयात आलेल्या १० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती स्वारातीचे अधिकष्ठाता तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.

बाल स्वास्थ्य आरोग्य शिबिराअंतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तिरळेपणा हा बऱ्याच अंशी लहानपणापासून होणारा आजार आहे. लहानपणी नजर चांगली असेल तर वय वाढत जातांना नजर स्थीर होत जाते, मात्र एका डोळ्याची नजर चांगली असेल आणि दुसऱ्या डोळ्यांची नजर कमकुवत असेल तर कमकुवत असलेला डोळा तिरळा होता.

त्यामुळे मुले लहान असतानाच त्यांची नजर सरळ आहे की नाही हे तपासणे आवश्यक असते. सुरुवातीला चष्मा लावून सरळ करण्याचा प्रयत्न केला जातो याहीपुढे जाऊन त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करून त्याची नजर सरळ करता येते व तरुणपणात त्यांच्या डोळ्यावरून येणाऱ्या समस्यांपासून त्याची सुटका होवू शकते. बाल स्वास्थ शिबिराअंतर्गत आयोजित तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरात लातूर जिल्ह्यातून आलेल्या २७ मुलांपैकी भूल देण्यास पात्र ठरणाऱ्या १० मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रिया केलेल्या मुलांपैकी एकाच कुटुंबातील २ मुलींचा समावेश असून त्या मुलांची शस्त्रक्रिया झालेली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेले नेत्रतज्ज्ञ अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरै यांनी आजपर्यंत बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ० ते १२ वयोगटातील १६०० रुग्णांवर तिरळेपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराच्या समारोपप्रसंगी अभ्यागत मंडळाच्या सदस्य जयश्री साठे, दत्तात्रय आंबेकर, डॉ. राकेश जाधव, डॉ. शंकर धपाटे, डॉ. राजेश कचरे, डॉ. अभिमन्यू तरकसे, डॉ. विश्वजित पवार, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. नागेश अब्दागिरे, पत्रकार व्यंकटेश जोशी, प्रमोद गवळे आदींसह डॉक्टरांची टीम, परिचारिका, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...