आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची मोठी हजेरी‎:टाळ- मृदंगाचा गजर, मुखी देवाचे नाम, शोभायात्रेचा उत्साह‎

परळी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पारंपरिक वेशभूषेसह शोभायात्रेत‎ सहभागी भाविक, हाती टाळ, मुखी‎ विठुनामासह ज्ञानोबा-तुकारामचा‎ जयघोष अशा भारलेल्या वातावरणात‎ परळीतील श्री रामलिंग चौंडेश्वरी‎ पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवारी‎ (ता.६ जानेवारी) करण्यात आली.‎ परळी शहरातील कोष्टी समाज‎ बांधवांच्या वतीने श्री रामलिंग‎ चौंडेश्वरी देवांग पुराण पारायण‎ सोहळ्याचे आयोजन केले होते. ३०‎ डिसेंबरपासून आयोजित या‎ सोहळ्यात सात दिवस विविध‎ कार्यक्रम पार पडले. सकाळी ११‎ वाजता परळी शहरातील विविध‎ मार्गावरून श्री चौंडेश्वरी देवीच्या‎ प्रतिमेची सवाद्य शोभायात्रा काढण्यात‎ आली.

यात भाविक मोठ्या संख्येने‎ सहभागी झाले होते. टाळ, मृदंगासह‎ ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात श्री‎ रामलिंग चौंडेश्वरी पारायण‎ सोहळ्याची भक्तीमय वातावरणात ही‎ शोभायात्रा निघाली. भाविकांनी‎ फुगड्या खेळून आनंद साजरा केला.‎ या कार्यक्रमात सकाळी ७ ते १० या‎ वेळेत श्री रामलिंग चौंडेश्वरी देवांग‎ पुराणाचे पारायण पार पडले. लता‎ येळाये यांच्या वाणीतून हा पारायण‎ सोहळा पार पडला.

गेल्या सात‎ दिवसापासून सुरू असलेल्या या सर्व‎ धार्मिक कार्यक्रमास‎ भाविक-भक्तांची मोठी गर्दी झाली‎ होती. सकाळच्या व संध्याकाळच्या‎ सत्रातील व चौंडेश्वरी देवांग पुराण‎ पारायण व हरीपाठ, भजन, कीर्तन‎ श्रवणासाठी शहरातील महिला-पुरूष‎ मोठ्या संख्येने हजेरी लावत होते.‎ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परळी‎ कोष्टी समाजातील महिला, पुरूष‎ परिश्रम घेतले. महाप्रसादाने‎ कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी‎ भाविक मोठ्या संख्येने हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...