आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:दांडीबहाद्दर शिक्षकांवर कार्यवाही करा, अन्यथा शाळेला टाळे लावू

केज8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हनुमान वस्तीवर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन शिक्षक कार्यरत असून एका दांडी बहाद्दर शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकांवर ५ वर्गाचा अध्यपणासह इतर कामांचा ताण वाढला आहे. त्यामुळे दांडी बहाद्दर शिक्षकांवर कार्यवाही करावी अन्यथा २५ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकू असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.

या शाळेवर दोन शिक्षक असून एका शिक्षकांकडे मुख्याद्यापक पदाचा पदभार आहे. तर दुसरे शिक्षक महावीर उत्तम मोहिते हे कळंब (जि. उस्मानाबाद) येथून अपडाऊन करतात. मात्र मोहिते सतत शाळेला दांड्या मारत असून ते अनधिकृत कारणे सांगून शाळेला गैरहजर राहतात. त्यामुळे येत्या २४ नोव्हेंबरपर्यंत शिक्षकाची व्यवस्था करून दांडी बहाद्दर शिक्षक महावीर मोहिते यांची चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा २५ नोव्हेंबर रोजी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करू असा इशारा शालेय व्यवस्थापन समितीचे श्रीमती एस.पी. चौरे, भारत चाटे, अप्पाराव सारूक, भागाबाई चौरे, गयाबाई चौरे, यशोदा चौरे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...