आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद:अवैध गर्भपात, गर्भाशय पिशवी शस्त्रक्रिया रोखण्यास पावले उचला

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

३० वर्षे वयाखालील महिलांच्या गर्भपात व गर्भाशय पिशवीसंदर्भातील शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे अवैध गर्भपात व गर्भाशय पिशवी शस्त्रक्रिया रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व आरोग्य विभागाची समिती स्थापन करावी आणि त्या समितीमार्फत कठाेर कारवाई गरजेची आहे, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषदेत दिली.

बीड शहरामध्ये आयाेजित महिला ऊसताेड कामगार परिषदेनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आल्या असता त्यांनी शनिवारी (दि. १) शासकिय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेने जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हा प्रमुख अप्पासाहेब जाधव, अॅड. संगीता चव्हाण, ज्याेती ठाकरे आदी उपस्थित हाेते.

डाॅ. गाेऱ्हे म्हणाल्या, जून २०१९ मध्ये माझ्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समितीने महिला ऊसताेड कामगारासंबंधीत शिफारशी राज्य सरकारकडे सुपूर्द केल्या. त्याचा सरकारने स्वीकार केला मात्र त्यासंदर्भत पुढे काहीच झाले नाही यासाठी आम्ही आता सातत्याने पाठवुराव करणार आहाेत. गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड मजूर नोंदणी, त्यांच्या पाल्यांची वसतिगृहामध्ये निवास, भोजन व शिक्षणाची व्यवस्थांसह समाज कल्याण, आरोग्य, महिला व बाल विकास तसेच शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग आदी संबंधित सर्व विभागांनी संयुक्तिक प्रयत्न करणे गजेचे आहेत. तसेच ऊसतोड मजुरांच्या पाल्यांची आठवीनंतरच्या शिक्षणाची सोय व्हावी, अशी मागणी केली जाणार आहे.

संवेदनशीलपणा आणि इच्छाशक्तीची गरज
राज्यातील ऊसताेड महिला किंवा इतर महिलांच्या समस्यांबाबती अनेक ठिकाणी चर्चा हाेते, निर्णय घेतले जातात मात्र त्याचे पुढे काय हाेते हा प्रश्न आहे. यशस्वीपणे अंमलबजाणी हाेण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची साथ मिळणे गरजेचे आहे. तरच स्त्रीभृण हत्या, बालविवाह, गर्भपात, बलात्कार यासह अन्य प्रश्नांवर वचक निर्माण हाेईल. यासाठी प्रत्येक घटकात संवेदनशीलपणा व इच्छाशक्तीची गरजेची आहे, अस स्पष्ट मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.

बातम्या आणखी आहेत...