आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तालखेड ते जामगा तांडा रस्ता होणार ; लक्ष्मण पवार यांच्या उपस्थितीत झाले भूमिपूजन

गेवराई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई विधानसभा मतदारसंघातील तालखेड ते जामगा तांडा ते येळा तांडा या ४ किलोमिटर रस्त्याचे डांबरीकरण व प्रजिमा ते डुब्बा मजरा या दीड किलोमिटर रस्ता डांबरीकरण असे ३ कोटी ९२ लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ आमदार लक्ष्मण पवार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहन जगताप होते तर व्यासपीठावर भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष देवीदास फलके, शरद यादव, रमेश मोरे, मोहन जाधव , लक्ष्मण चव्हाण,अशोक वडघणे, विष्णु शेलार, संजय चव्हाण,दिलीप आगे, प्रल्हाद हुबे ,दसरथ राऊत ज्ञानेश्वर पवार , बप्पासाहेब घाटूळ, सुग्रीव भालेराव, पांडुरंग आरडे, केशव घोलप, सखाराम शिंदे, रावसाहेब बापु, गणेश तौर , प्रल्हाद येळापुरे सर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले, तांड्यांचे रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत, तांडे वस्तीवरील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे. भाजपची सत्ता नव्हती तेव्हा विरोधक कामे करून देण्यास अडथळे निर्माण करत होते. आता भाजपची सत्ता आली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवत प्रत्येक वस्तीवर रस्ते दर्जेदार करून घेणार आहे. विकासाची गंगा खेचून आणणार व भरीव निधी मंजूर करुन कामे करणार आहे. येळा तांड्यासाठी सभामंडप मंजुर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.गावकरी मोहन जाधव, विठ्ठल जाधव,विजय जाधव, अशोक राठोड, राहुल, राठोड,मितुन राठोड, भिमराव जाधव, भारत राठोड, बापुराव राठोड यांनी पवार यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...