आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन:बीड शहरासह जिल्ह्यात शिक्षक दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता.५ सप्टेंबर) शिक्षक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यासह गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन‌ यांच्या प्रतिमेचेही ठिकठिकाणी पूजन करत अभिवादन करण्यात आले.

बीड शहरातील स्वातंत्र्यसेनानी रामराव आवरगावकर विधी महाविद्यालय येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.प्रमोद वाघमारे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा.डॉ. अनिसुर रहमान, प्रा. सुनील हराळे, उत्तम थोरात, सुभाष वायाळ, मुकेश भगुंडे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी पुष्प वाहून अभिवादन केले.

केएसके महाविद्यालय, बीड
येथील सौै.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर उर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ.शिवाजी शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य एल.एन.सय्यद, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर आदी उपस्थित होते.

आदर्श बालवाडी, बीड
शहरातील आदर्श बालवाडी व माऊली प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक संतोष माने यांनी शिक्षक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षक धोंडीराम सानप हे हजर होते. यासह डंबरे, लाटे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचलन सहशिक्षक रमाकांत डोळस यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

योगेश्वरी नूतन विद्यालय
येथील कै.दे.बा.ग.योगेश्वरी नूतन विद्यालय प्राथमिक विभागात भारताचे पहिले उपराष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजेच शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थी प्रतिनिधी सिद्धी दहिफळे आणि सर्व वर्गांचे वर्ग प्रतिनिधी यांनी गुलाब पुष्प देऊन वर्गशिक्षकांचा सन्मान केला. सहशिक्षक प्रभू बागल यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची माहिती, तसेच गुरुभक्त अरुणी याची गोष्ट सांगून शिक्षकांचे आपल्या जीवनातील योगदान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मुख्याध्यापक खंडेराव नांदगावकर यांनीही मार्गदर्शन केले.

केएसपी विद्यालय
बीड शहरातील केएसपी विद्यालयात संस्थाध्यक्षा अंजली शेळके, प्रभारी मुख्याध्यापक जगदीश शिंदे, गटशिक्षणाधिकारी ऋषिकेश शेळके यांच्या उपस्थितीत शिक्षक दिनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती होती.

महिला महाविद्यालय, बीड
जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गेवराई येथील महिला महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बापू घोक्षे हे होते. रासेयोचे कार्यक्रमाधिकारी प्रा. रामहरी काकडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठी हजेरी होती.

कै.भगवानराव ढोबळे मूक-बधिर निवासी विद्यालय
गेवराई येथील कै.भगवानराव ढोबळे मुकबधिर निवासी विद्यालय व मतिमंद निवासी विद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करुन शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी गुरुजणांना पुष्प देऊन कृतज्ञता व्यक्त केली. यासह विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी शिक्षक दिनाविषयी आपले विचार मांडले.

स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल, बीड
स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या औचित्याने सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या हस्ते संकुलातील शिक्षकांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.डाॅ दिपक देशमुख यांनी प्रास्ताविक केले. उमेश जगताप, प्रा. चंद्रकांत मुळे, गजाननराव जगताप, डॉ विवेक पालवनकर, प्रमोदराव कुलकर्णी, सतीश कुलकर्णी आदी हजर होते.

बातम्या आणखी आहेत...