आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार वितरण:शिक्षक करतात विद्यार्थी व राष्ट्र घडवण्याचे पवित्र काम

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने झालेल्या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील ११, माध्यमिक विद्यालयांमधील १० शिक्षकांना व एक विशेष शिक्षक पुरस्कार जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे सोमवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, मुख्य लेखा वित्त अधिकारी शिवप्रसाद जटाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र शिंदे, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सरकुंडे, प्राचार्य डॉ विक्रम सारुक, गौतम खटोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतानाजिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर म्हणाले. विद्यार्थी आणि राष्ट्र घडविण्याचे पवित्र काम शिक्षक पार पाडतात. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगार बहुसंख्येने असलेला जिल्हा आहे. येथे अनेक अडथळे व अडचणीतून विद्यार्थ्याला शाळेपर्यंत आणावे लागते, अशा परिस्थितीतून त्याला घडवावे लागते. अशा स्थितीत देखील जिल्ह्यात चांगले काम होत आहे. विविध क्षेत्रात विकास होण्यासाठी असे अनेक समस्यांवर काम करावे लागणार आहे. यामध्ये बालविवाह प्रतिबंध, स्त्री भृण हत्या या अनेक सामाजिक विषयांमध्ये देखील शिक्षक हे जनजागृती च्या माध्यमातून योगदान येण्यासाठी पुढे यावे. जवळपास ९८% शिक्षक चांगले काम करत असल्याचे येथे सांगितले गेले आहे. यातून शिक्षणासाठी असलेले तळमळ दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांनो ऑनलाइन प्रभावातून बाहेर पडा, अष्टपैलू व्हा : पवार सीईओ अजित पवार म्हणाले, विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी खेळ, छंद पद्धतीचा वापर करण्यासाठी अष्टपैलू व्हावे. जग वेगात बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव तंत्रज्ञानामध्ये झालेला आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांना देखील अभ्यास करून उत्तुंग यश मिळविणारे विद्यार्थी घडवावे लागतील.

बातम्या आणखी आहेत...