आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राणघातक हल्ला:आत्याची छेड; चुलत्याकडून पुतण्याचा खून

वडवणी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्याची छेड काढल्याने चुलत चुलत्याने पुतण्यावर काेयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली असुन या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पुतण्याचा बीड जिल्हा रूग्णलयात मृत्यू झाला. सुरज श्रीकृष्ण शिंदे (१५ रा.पिंपरखेड.ता. वडवणी ) असे मयत पुतण्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी चुलत चुलता गणेश शिंदे याला अटक केली आहे. दरम्यान मारेकरी असलेला चुलता गणेश शिंदे याची ओडीओ क्लिप जिल्ह्यात सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता गावातील मंदिराच्या मागील रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सुरज शिंदे हा मुलगा दिसल्याने त्याला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यांनतर रात्री साडेनऊ वाजता सुरज याचा मृत्यू झाला. सुरज याच्यावर त्याचा चुलता गणेश शिंदे याने काेयत्याने हल्ला केल्याने डोक्यात खोलवर एक वार गेला होता. या वारामुळे मेंदुला दुखापत झाली होती.

दरम्यान गुरुवार २४ नोव्हेंबर रोजी सुरज याच्या खुन प्रकरणातील आरोपी असलेला चुलत चुलता गणेश अर्जुन शिंदे (२०) याला अटक करण्यात आली असून सुरज शिंदे याच्या मृतदेहावर पिंपरखेड येथील स्मशानभूमीत सायंकाळी ६ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात आजोबा संपती गणपती शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी गणेश शिंदे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...