आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हाळसपिंपळगावातच तहसीलदारांची कारवाई:खासगी टेम्पोमधून जाऊन तहसीलदारांची गोदापात्रात पुन्हा धाड; सहा ट्रॅक्टर पकडले

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच मंगळवारी दुपारी तहसीलदार सचिन खाडे यांनी धाड टाकून ट्रॅक्टर केनीसह ताब्यात घेतले.

मंगळवारी तालुक्यातील म्हाळसपिंपळगाव याठिकाणी केनीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाली. मात्र वाळू उपसा करणारे त्यांच्या मागावर राहून याचे लोकेशन थेट नदीपात्रापर्यंत देत असल्याने कारवाई करताना तहसीलदार खाडे यांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मंगळवारी खाडे यांनी महसूल कर्मचाऱ्यांना एका खाजगी टेम्पोत पाठीमागे बसवून म्हाळसपिंपळगाव याठिकाणी पाठवले. यामुळे माफिया तहसीलदार यांच्यावर पाळत ठेवून राहिले, तर टेम्पोतून गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनी गोदावरी नदी पात्रात धाड टाकत ट्रॅक्टर ताब्यात घेतले. यानंतर तहसीलदार खाडे यांनी त्याठिकाणी जाऊन कारवाई केली. दरम्यान, सुरक्षेचा प्रश्न असूनही म्हाळसपिंपळगाव सर्व ट्रॅक्टर पुन्हा बस डेपोतच लावण्यात आलेआहेत. मात्र, बंदोबस्तासाठी पेालिसांना पत्र दिल्याची माहिती खाडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...