आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनमध्ये गमावला होता रोजगार:हप्त्याच्या चिंतेतून टेम्पोचालकाने केली आत्महत्या; शिरूरघाट येथे बाभळीच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली

केज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे : नोकरीतून काढल्यामुळे हताश युवकाची विहिरीत उडी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आणि त्यातच रोजगार गेल्याने अाता टेम्पोचे हप्ते कसे फेडायचे? या विवंचनेतून ३० वर्षीय टेम्पोचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील शिरूरघाट येथे मंगळवारी (दि. २५) सकाळी वाजेच्या सुमारास उघडकीस अाली. लक्ष्मण हरिदास घोडके (३०) असे आत्महत्या केलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.

शिरूरघाट येथील लक्ष्मण घोडके या तरुणाने हप्त्यावर टेम्पो खरेदी केला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे वाहतुकीला बंदी असल्याने टेम्पो उभा अाहे. जवळ पैसा नाही अाणि हाताला राेजगारही नाही. त्यामुळे टेम्पोचे हप्ते फेडण्यासाठी पैसेच नसल्याने लक्ष्मण घोडकेने नैराश्यातून हनुमंत नामदेव लोंढे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचा भाऊ बळीराम घोडके यांच्या खबरीवरून केज पोलिसांत अाकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, सतत वाढत जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे दरदिवशी जीवन संपवणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचा आधार जात असल्याने आता लॉकडाऊनला विविध स्तरातून विरोध होताना दिसत आहे.

नोकरीतून काढल्यामुळे हताश युवकाची विहिरीत उडी
परळी | पुण्यातील खासगी कंपनीने नोकरीतून काढून टाकले. त्यामुळे निराश झालेल्या अजय बन्सी सलगर (वय २२, रा. वाघाळा) या युवकाने गावाकडे येऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (२५ मे) सायंकाळी परळी तालुक्यातील वाघाळा येथे उघडकीस आली. अजय पुणे येथील खासगी कंपनीत कामाला होता. ५ दिवसांपूर्वी त्याला कंपनीने नोकरीतून काढून टाकले होते. त्यामुळे हताश झालेला अजय गावाकडे आला होता. अखेर नैराश्यातून त्याने मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

बातम्या आणखी आहेत...