आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा पावला:शहरात दहा दिवसांत दहा क्विंटल पेढ्याच्या मोदकांची झाली विक्री

बीड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदाच्या गणेशोत्सवात स्वीट होम चालकांना गणपती बाप्पा पावला आहे. एकट्या बीड शहरातील २८ स्वीट होममध्ये गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात तीन लाख रुपये किमतीचे एक हजार किलो पेढ्यांचे मोदक बाप्पांसाठी विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बीड शहरात सध्या २८ स्वीट होत असून जिल्ह्याची ही संख्या शंभराच्या घरात आहे. कोरोनाचे संकट टळल्याने जिल्ह्यात दहा दिवसांच्या गणेशोत्सवात गणेश मंडळांसह गणेशभक्तांत चांगलाच उत्साह होता.बाप्पाच्या प्रसादासाठी पेढे, चॉकलेट मोदक, खोबरा मोदक, मलई पेढा मोदकाला गणेशभक्तांकडून चांगलीच मागणी होती. कारण यातील पेढा मोदक उपवासासाठी चालत असल्याने या मोदकाला अधिक मागणी दिसून आली. जिल्ह्यात पेढा मोदकाला साडेतीनशे-चारशे रुपये किलोचा भाव होता.

बीड शहरात कोन्हारवाडी, काठोडा, खापर पांगरी, कुर्ला या गावातील शेतकरी दूध विक्रीसाठी आणतात. स्वीट होम चालक हे दूध खरेदी करत घोटून मोदक तयार करतात. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात एका स्वीट होमवर अंदाजे १५ किलो पेढ्याच्या मोदकाची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर शंभर रुपयांनी वाढला भाव कोरोनापूर्वी २०१९ मध्ये पेढ्याच्या मोदकाचा भाव तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिकिलो होता. २०१९ मध्ये दुधाचा भाव साधारणपणे ५५ ते ६० रुपये प्रतिलिटर होता. तीन वर्षांत दूध व गॅसच्या वाढलेल्या दरामुळे पेढ्याच्या मोदकांचा भाव चारशे रुपये प्रतिकिलेाच्या घरात गेला.

तीन लाख रुपयांच्या पेढ्यांच्या मोदकांची विक्री
कोरोनाच्या काळात सर्वच स्वीट होम चालकाचे हाल झाले. पेढ्यांची विक्री होत नसल्याने आम्हाला शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येणारे दूध कमी करावे लागले. जसा माल लागेल तसा कमी करावा लागला. परंतु यंदाच्या गणेशोत्सवात चित्र बदलले. एका स्वीट होमवर दहा दिवसाच्या काळात अंदाजे एक हजार किलो पेढ्याच्या मोदकांची विक्री झाली असल्याने अंदाजे तीन लाख रुपये किमतीचे पेढे विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- किशोर शर्मा, बीड जिल्हा अध्यक्ष, मिठाई व फरसाण संघटना

बातम्या आणखी आहेत...