आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:बीडसह अंबाजोगाईत ‘थाळी नाद’ आंदोलन,   युवा सेनेकडून इंधन दरवाढीचा जोरदार निषेध  बीडसह अंबाजोगाईत ‘थाळी नाद’ आंदोलन,   युवा सेनेकडून इंधन दरवाढीचा जोरदार निषेध

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल, डिझेल, गॅसची झालेली दरवाढ ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. या दरवाढीच्या निषेधार्थ रविवारी शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर बहिर यांच्या नेतृत्वात ‘थाळी बजाओ’ आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल, डाळी अशा सर्वच वस्तूंचे भाव रोज वाढत आहेत. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले.केंद्र सरकार महागाईच्या बाबतीत ‘ब्र’ शब्दही काढत नाही. आंदोलनादरम्यान इंधन दरवाढ रोखण्याची मागणी करत युवा सेनेच्या आंदोलकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, केंद्र सरकारच्या विरोधात बोंबा मारून निषेध केला. या वेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सागर बहिर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, ॲड. संगीता चव्हाण, बप्पा घुगे, हनुमान जगताप, गोरख शिंगण, सुनील सुरवसे, अमर नाईकवाडे, भय्या मोरे, गणा तांदळे, विपुल पिंगळे, धूत, धनंजय वाघमारे, अविनाश पुजारी, अजिंक्य पवळ, कल्याण कवचट, सूरज चुंगडे, जगदीश उबाळे, आकाश जगताप, शुभम कातागडे, अश्फाक शेख, कमलेश बोरवडे, वैभव जाधव, शुभम प्रधान, अक्षय काशीद, राहुल नन्नवरे, चंदू काळे, आकाश शिंगण, विशाल शिंदे, शेख सोफियान, आदित्य सातपुते, चंदू ठोंबरे, प्रतीक गलधर, परमेश्वर सातपुते या आंदोलनात सहभागी झाले होते.

अंबाजोगाईतही केंद्र सरकारचा निषेध
अंबाजोगाई | शहरातील सावरकर चौकातही इंधन दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात थाळी नाद आंदोलन केले. अंकित प्रभू, अभिमन्यू खोतकर, शुभम डाके, विनोद पोखरकर, अर्जुन वाघमारे, गजानन मुडेगावकर यांच्या मार्गदर्शनात युवासेनेचे तालुकाप्रमुख अक्षय भुमकर व शहरप्रमुख आकाश सुरवसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...