आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

27 गुंठे जमीन‎:"त्या'' पारधी कुटुंबाचा‎ घरकुलाचा प्रश्न मार्गी!‎

बीड‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंजूर घरकुलासाठी जागा मिळत‎ नसल्याने उपोषण करताना मृत्यू‎ झालेल्या अप्पाराव पवार यांच्या‎ कुटुंबियांना अखेर जागा मिळाली.‎ शुक्रवारी यासाठीची जागेची‎ रजिस्ट्री करण्यात आली. यावेळी‎ आमदार संदीप क्षीरसागर यांनी‎ पारधी कुटुंबाची भेट घेतली.‎ सामाजिक कार्यकर्त्यांची ही‎ उपस्थिती होती.‎ बीड तालुक्यातील लिंबारूई‎शहाजानपूर येथे पारधी समाज‎ मोठ्या प्रमाणावर असून मागील‎ वीस वर्षापासून हक्काच्या घरासाठी‎ हा समाज लढत होता.

पारधी‎ समाजाला शहाजानपूर परिसरात‎ हक्काचे निवासी घरकुलसाठी २७‎ गुंठे जमीन आज प्रत्यक्षात दिली‎ आहे. या सर्व लाभार्थींना पंचायत‎ समितीच्या वतीने शबरी आवास‎ योजना अंतर्गत कायमस्वरूपी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मजबूत घरकुल बांधून देण्यात येईल‎ रजिस्ट्री झाल्यावर‎ लिंबारुई/शहाजानपुर येथील पारधी‎ समाजातील बांधवांच्या चेहऱ्यावर‎ आनंद आणि हसू दिसले तो माझे‎ जीवनातील सर्वात मोठा सन्मान‎ आणि सत्कार आहे असे प्रतिपादन‎ आ. संदीप क्षीरसागर यांनी पारधी‎ समाजातील बांधवांना जमीन‎ हस्तांतरण प्रसंगी व्यक्त केले.‎

सामाजिक संस्थांनी‎ घेतला पुढाकार‎‎ अप्पाराव पवार यांना जागा मिळावी‎ यासाठी सामाजिक कार्यकर्ते‎ तत्वशील कांबळे, अशोक तांगडे,‎ मनिषा तोकले यांच्यासह इतरांनी‎ पुढाकार घेतला होता.‎ जिल्हाधिकारी शर्मा, सीईओ पवार,‎ एसीअो सोळंके यांनीही बैठक‎ घेऊन जागेचा प्रश्न मार्गी लावला‎ होता.‎

बातम्या आणखी आहेत...