आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड:पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 4 मजली इमारत कोसळली

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या समोरील भागातील रहेमतनगर भागात बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी टळली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रहेमतनगर येथे चार मजली इमारत होती. बुधवारी दुपारी अडीच वाजता पत्त्यांच्या बंगल्यासारखी खाली कोसळली. जीवितहानी टळली असली तरी इमारतीतील नागरिकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. ही दुर्घटना घडण्याअगोदर दहा मिनिटे जिल्हा प्रशासनाने इमारत पोलिसांच्या मदतीने रिकामी केली होती. इमारत कोसळण्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रहेमतनगर येथे दोन इमारतींच्या मधोमध रिकाम्या जागेवर बांधकाम सुरू होते. याचदरम्यान पाया खोदत असताना हादरा बसून चार मजली इमारत बुधवारी सकाळी कलली होती. बीड येथील छायाचित्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांनी इमारत पाहून जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत इमारतीमधील सर्वच नागरिकांना बाहेर काढले.

बातम्या आणखी आहेत...