आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:वडवाडी दरोड्यातील फरार म्होरक्या अखेर झाला गजाआड

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडवाडी दरोडा प्रकरणातील फरार मुख्य आरोपीस नेकनूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करत गजाआड केले.नेकनूर पोलिसांनी सहायक निरीक्षक विलास हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. लक्ष्मण रावसाहेब पवार (३२, रा.भोगजी, ता.कळंब) असे त्या आरोपीचे नाव आहे.वडवाडी येथे ४ ऑगस्ट रोजी दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात १० दरोडेखोरांनी तब्बल १० लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केला होता. यातील इतर आरोपींना पोलीसांनी या पूर्वीच पकडले होते. दरम्यान दरोड्यातील मुख्य आरोपी लक्ष्मण पवार हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

पोलीस त्याचा वेळोवेळी शोध घेत होते असे असतांनाच हा आरोपी कळंब तालुक्यातील भोगजी गाव परिसरात ऊसाच्या शेतात थांबला असल्याची गुप्त माहिती नेकनूर पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विलास हजारे, उपनिरीक्षक पानपाटील, हवालदार दिपक खांडेकर, प्रशांत क्षीरसागर, पो.ना.अनिल राऊत, पोलिस शिपाई बाळासाहेब ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी लक्ष्मण पवार यास पाठलाग करत ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...